facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / मुंबई / ‘त्या’ झोपड्यांवरील कारवाईस मुदतवाढ

‘त्या’ झोपड्यांवरील कारवाईस मुदतवाढ

मुंबईकरांना पिण्याचे पाणी पुरवणाऱ्या जलवाहिन्यांलगत वसलेल्या जवळपास १५ हजार झोपड्यांतील रहिवाशांचे स्थलांतर करून झोपड्या तोडण्याची कार्यवाही महापालिकेला अद्याप पूर्ण करता आलेली नाही. पालिकेने गुरुवारी पुन्हा मुदतवाढ देण्याची विनंती केल्याने उच्च न्यायालयाने ती मान्य केली.

जलवाहिन्यांलगत वसलेल्या झोपड्यांमुळे मुंबईकरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत असल्याची बाब जनहित मंचने जनहित याचिकेमार्फत निदर्शनास आणली होती. त्यावर उच्च न्यायलायाने काही वर्षांपूर्वी आदेश देताना या झोपडपट्ट्यांमधील रहिवाशांचे पुनर्वसन करून झोपड्या हटवण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेकडून चार टप्प्यांत ही कारवाई सुरू आहे. मात्र, पुनर्वसनासाठी पात्रता निश्चित करणे, झोपडीधारकांचे नियमानुसार पुनर्वसन करणे आदी बाबी किचकट असल्याने आतापर्यंत पहिला टप्पा व दुसऱ्या टप्प्यातील अर्धे काम झालेले आहे. किचकट काम पाहता दुसऱ्या टप्प्यासाठी ३१ डिसेंबर २०१६पर्यंत, तिसऱ्या टप्प्यासाठी ३० जून २०१७पर्यंत आणि चौथ्या टप्प्यासाठी ३१ डिसेंबर २०१७पर्यंत मुदतवाढ द्यावी, असा विनंती अर्ज महापालिकेने केला होता.

या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर कारवाईचे स्वरूप पाहता विनंती मान्य करत असल्याचे न्या. अभय ओक व न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठाने आदेशात स्पष्ट केले. त्याचवेळी यासंदर्भातील एका व्यक्तिगत प्रकरणात दिलासा देणारा आदेश उच्च न्यायालयाकडून झालेला असल्याने त्या याचिकेसह ही जनहित याचिका १९ जुलैला सुनावणीसाठी ठेवण्याचे निर्देश रजिस्ट्रारना दिले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *