facebook
Tuesday , May 30 2017
Breaking News
Home / मुंबई / ब्रँडिंग वाढवण्यासाठी आता स्टेशन संचालक

ब्रँडिंग वाढवण्यासाठी आता स्टेशन संचालक

रेल्वेचे ब्रँडिंग वाढवण्यासाठी आणि जनसामान्यांतील प्रतिमा अधिक चांगली करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने नवीन संकल्पना आखली आहे. त्याअंतर्गत देशभरातील ६० प्रमुख स्टेशन्सवर स्टेशन मास्टरऐवजी स्टेशन संचालकांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी रेल्वे सेवेत येणाऱ्या ‘अ’ श्रेणीतील तरुण, तडफदार अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा मानस आहे. त्यात, मुंबईतील सीएसटी, मुंबई सेंट्रलसह अन्य दोन स्टेशन्सचा समावेश असणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने थेट रेल्वे सेवेत आलेल्या अधिकाऱ्यांना स्टेशन संचालक म्हणून जबाबदारी देण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या टप्प्यात, अ श्रेणीतील १२ अधिकाऱ्यांना स्टेशन संचालक म्हणून नेमण्यात येणार असून त्यात, मुंबई, दिल्ली, जयपूरचा समावेश आहे. त्यानंतर इतर ठिकाणी स्टेशन संचालक नियुक्त केले जाणार आहेत.

रेल्वे स्टेशन्सचा मुखत्यार म्हणून स्टेशन मास्टरची नेमणूक केली जाते. अनुभवसंपन्न असणाऱ्या स्टेशन मास्टरांकडून स्टेशन्सकडे लक्ष ठेवले जाते. या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने देशभरातील अ आणि ‘अ१’ श्रेणीतील ६० स्टेशन्सची धुरा रेल्वे सेवेत सामील होणाऱ्या तरुण अधिकाऱ्यांकडे देण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रमुख रेल्वे स्टेशन्सना केवळ वाहतुकीच्या दृष्टीने नव्हे तर आर्थिक आणि व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे स्थान मिळवून देण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे. त्यानुसार, या अधिकाऱ्यांकडे रेल्वे स्टेशन, परिसराच्या कारभाराची जबाबदारी सोपवण्यात येणार आहे.

सध्या कनिष्ठ प्रमोटी अधिकाऱ्यांना मुख्य स्टेशन मॅनेजर, स्टेशन मॅनेजर, स्टेशन अधीक्षक म्हणून नियुक्त केले जाते. त्यांच्याकडे स्टेशनची स्वच्छता, तिकीट यंत्रणा, पार्सल आदींवर नियंत्रण, देखरेख ठेवण्याचे अधिकार नसतात. ही तफावत दूर करण्यासाठी रेल्वेत थेट सेवेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *