facebook
Tuesday , January 24 2017
Breaking News
Home / मुंबई / भांडुप स्टेशनवर तरुणी जखमी

भांडुप स्टेशनवर तरुणी जखमी

मध्य रेल्वेवर भांडुप स्टेशनवर दुरुस्तीचे काम सुरू असताना तिकिटांच्या रांगेत असलेली तरुणी गुरुवारी सकाळी छताला आधारासाठी लावलेला बांबू अंगावर पडून जखमी झाली. जखमी झालेल्या श्वेता गुंडे (२०) या तरुणीवर उपचारादरम्यान सहा टाके घालण्यात आले.

भांडुप स्टेशनवर तिकीट खिडकीसह अन्य परिसरात दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यासाठी तिकीट खिडकीजवळ वरच्या भागात बांधकामाच्या हेतूने काही बांबू बांधण्यात आले होते. गुरुवारी सकाळी १०.३० च्या सुमारास श्वेता तिकीट घेण्यासाठी रांगेत उभी असताना एक बांबू तिच्या डोक्यावर आदळला. रेल्वे पोलिसांनी तिला तात्काळ उपचारांसाठी मुलुंड येथील रुग्णालयात नेले. तिथे तिच्यावर उपचार करण्यात आले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *