facebook
Tuesday , May 23 2017
Breaking News
Home / संपादकीय / पुनश्य हरी ओम

पुनश्य हरी ओम

पुनश्य हरी ओम

माहितीचा महासागर विविध माध्यमांच्या रुपात खुला झाला आहे. संवादासाठी सोशल मिडियाचा प्रभावी वापर होऊ लागला आहे.दूरचित्रवाहिन्यांवरील बातमीपत्र,वत्त्तपत्रातून रकानेच्या रकाने भरून येणाºया बातम्या रोज वाचकांपर्यंत धडकतात. व्हॉटसअ‍ॅप,व्टिटर, फेसबुक या सोशल मिडियाच्या माध्यमातून जग जवळ आले आहे. जगभरातील घडामोडी तळहातावरील मोबाईलच्या स्क्रिनवर एका क्लिकवर पहायला, वाचायला मिळतात.वृत्तवाहिनी म्हणुन आवाजने आपला ठसा या

शहरावर तसेच उपनरांवर उमटवलेला आहे. आवाज न्यूज चॅनेलनेआवाज न्यूज लाईन या वेबपोर्टलच्या माध्यमातून पुनश्च हरी ओम केले आहे.

या धावत्या जगात आपण कोठे मागे पडू नये,क्षणाक्षणाला घडणाºया विविध घटना,घडामोडींची अपडेटस अचूकपणे वाचक, दर्शकांपर्यंत अत्यंत गतीने पोहोचविण्याचेव्रत आवाजने स्वीकारले आहे.डिजिटलच्या या युगात ब्रेकिंग न्यूजला महत्व आले आहे. काळाबरोबर धावताना आधुनिक तंत्रज्ञानाचा अंगिकार करणे हे स्वभाविकपणेआलेच आधुनिक यंत्रसामग्री, तंत्रज्ञान याचा अवलंब करून आवाजने नवे पाऊल उचलले आहे. सक्षम, अनुभवी अशा बातमीदारांचे जाळे, त्याला तंत्रज्ञानाची जोड देऊन आवाजने अधिक दमदार पाऊल टाकले आहे.

यापुर्वी आवाजला वाचक,दर्शकांनी उदंड प्रतिसाद दिला आहे.त्यांच्या पाठबळावरच पुन्हा एकदा आवाजने आवाजने आधुनिक पत्रकारितेचे पाऊल उचलले आहे.वाचक, दर्शकांची साथ मिळत राहिल.यात शंका नाही.परंतु वाचक,दर्शकांचा सहभाग आमच्यादृष्टीने महत्वाचा आहे. सिटीझन जर्नालिस्ट कल्पना सर्वांना ज्ञात आहे. बातमीमल्य असेल अशी घटना ज्याला दिसेल, त्याने ती टिपावी, मोबाईल कॅमेरॅत कैद करून जमेल तशी आपल्या पद्धतीने शब्दबद्ध करून व्हॉअसअ‍ॅपव्दारेआवाजकडे पाठवावी.निश्चितच त्याची दखल घेतली जाईल.समाजहितासाठी व्यक्त होणारा तुमचा आमचा आवाज परिवर्तन घडवून आणण्यास मदत करेल. पत्रकारिता हा लोकशाहिचा चौथा स्तंभ आहे. म्हणुन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार केवळ मिडियाला आहे, असे नाही. हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत अधिकार आहे. तो बजावण्यासाठी आवाज हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. त्या व्यासपीठावर आपले स्वागत चला तर मग परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकूया….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *