facebook
Friday , May 26 2017
Breaking News
Home / अहमदनगर / देसवंडीत आढळला मृत बिबट्या

देसवंडीत आढळला मृत बिबट्या

राहुरी शहरापासून अवघ्या तीन किमीवर असलेल्या मुळा नदीकाठावरील देसवंडी या गावासह परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या गुरुवारी मृतावस्थेत आढळून आला. वनखात्याने रितसर पंचनामा व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केल्यानंतर देवनदीच्या पात्रात बिबट्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. वाड्या वस्त्यांवरील शेळ्या, मेंढ्या फस्त करून शेतकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

देसवंडी येथील अण्णासाहेब काशिनाथ शिरसाट यांच्या शेतामध्ये गुरुवारी सकाळी मृत अवस्थेत बिबट्या आढळून आला. शिरसाट नेहमीप्रमाणे शेतामध्ये गेल्यानंतर त्यांना बिबट्या दिसला. जवळीलच विलास शिरसाट यांच्या निर्दशनास ही बाब आल्यानंतर त्यांनी वनखात्याला माहिती दिल्यानंतर वनक्षेत्रपाल यू. बी. वाघ, वनपाल जी. एम. लोंढे, यू. पी. खराडे, एम. एस. गायकवाड, एम. एल. मोरे हे घटनास्थळी गेले. वांबोरी येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून अहवाल सादर केला. मृत बिबट्या हा नर जातीचा असून अंदाजे चार वर्षे वयाचा आहे. तीन ते चार दिवसांपूर्वीच बिबट्या मृत झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला. कुजलेल्या अवस्थेत बिबट्या होता. नियमानुसार सोपस्कार पार पडल्यानंतर त्याच्यावर देवनदीपात्रात अंत्यसंस्कार करण्यात आले. बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी गर्दी केली होती.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *