facebook
Wednesday , March 29 2017
Breaking News
Home / Hindi / Delhi / मातीच्या मुर्त्या बनवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

मातीच्या मुर्त्या बनवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

आवाज न्यूज  नेटवर्क
आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पर्यावरणपूरक अशा इकोफ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.  आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मुर्त्या का बनवत नाही ? मातीच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल असे पंतप्रधान मोदींनी सांगितले. पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे ही सुद्धा एकप्रकारची पूजाच आहे असे मोदींनी सांगितले.
दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी मोदी मन की बात कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधतात. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी रिओ ऑलिम्पिकमध्ये दमदार कामगिरी करणा-या पीव्ही सिंधू, साक्षी मलिक, दीपा कर्माकर आणि मराठ मोळया ललिता बाबरचे कौतुक केले. रिओ ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवून आपण कोणापेक्षा कमी नाही हे मुलींनी पुन्हा एकदा सिद्ध करुन दाखवले असे मोदींनी सांगितले.
क्रीडा क्षेत्रात आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, खेळांना प्रोत्साहनाची गरज आहे आणि हे काम जनताच उत्तम करु शकते असे ते म्हणाले. रौप्यपदक विजेत्या सिंधूचे प्रशिक्षक गोपीचंद यांचेही मोदींनी कौतुक केले. पुलेला गोपीचंद यांची खेळासाठी जी साधना आहे, समर्पण आहे त्याला मी सलाम करतो. ते उत्तम शिक्षक आहेत असे मोदी म्हणाले.
मन की बात मधील मुद्दे
– स्वच्छ गंगा आपल्या सरकारचे पहिले प्राधान्य असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले.
– शेजा-यांबरोबर आपले संबंध मैत्रीपूर्ण असले पाहिजेत.
– छत्तीसगडमध्ये १७०० पेक्षा जास्त शाळांमधील मुलांनी आपल्या पालकांना चिठ्ठी लिहून घरात शौचालय बांधण्याची मागणी केली.
– गरीब आणि गरजू लोकांच्या सेवेसाठी मदर तेरेसा यांनी आपले संपूर्ण आयुष्य घालवले.
– मराठमोळया ललिता बाबरचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कौतुक केले.
– पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गणेशोत्सव आणि दुर्गा पूजा पूर्यावरणपूरक इको फ्रेंडली पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले.
– पर्यावरण आणि समुद्राची काळजी घेणे ही सुद्धा एकप्रकारची पूजाच आहे.
– मातीच्या मुर्त्यांमुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.
– आपण आपल्या जुन्या परंपरेनुसार चिकणमातीच्या मुर्त्या का बनवत नाही ?.
– पुलेला गोपीचंद यांची खेळासाठी जी साधना आहे, समर्पण आहे त्याला मी सलाम करतो.
– आपल्या आयुष्यात आई इतकेत शिक्षक महत्वाचे आहेत, विद्यार्थ्यांसाठी शिक्षक आपले आयुष्य घालवतात .
– पाच सप्टेंबर माझ्यासाठी फक्त शिक्षक दिन नसतो तर, तो शिकण्याचाही दिवस असतो.
– पंतप्रधान मोदींनी साक्षी मलिक, पीव्हीसिंधू आणि दीपा कर्माकरच ‘मन की बात’ कार्यक्रमात बोलताना कौतुक केलं.
– क्रीडा क्षेत्रात आपल्याला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, खेळांना प्रोत्साहनाची गरज आहे आणि हे काम जनताच उत्तम करु शकते.
– पंतप्रधान ‘मन की बात’ कार्यक्रमातून जनतेशी संवाद साधत आहेत.
–  रिओ ऑलिम्पिकमध्ये पदके मिळवली, आपण कोणापेक्षा कमी नाही हे मुलींनी पुन्हा एकदा सिद्ध केले.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *