facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Hindi / Delhi / सरकारी काम आज बंद

सरकारी काम आज बंद

केंद्र सरकारची कामगारविषयक धोरणे कामगारांच्या हिताची नसल्याचा आरोप करत देश पातळीवरील दहा कामगार संघटनांनी आज, शुक्रवारी एकदिवसीय देशव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपामुळे बँकिंग, दूरसंचार व वाहतूक या प्रमुख सेवा कोलमडण्याची शक्यता आहे. कामगारांच्या हिताकडे सरकार लक्ष देत नसल्याचे संपकरी संघटनांचे म्हणणे आहे.

या संपामुळे बँकिंग, सार्वजनिक सेवा व दूरसंचार सेवा कोलमडणार आहेत. मात्र या संपात बेस्ट, एसटी बसेस, रिक्षा व टॅक्सी सहभागी होणार नाहीत. त्यामुळे मुंबईच्या सार्वजनिक सेवेवर ताण येणार नाही. सरकारला दिलेल्या १२ मागण्यांकडे सरकारने दुर्लक्ष केले असल्याचा दावा केंद्रीय कामगार संघटनांनी केला आहे. यामध्ये अकुशल कामगारांना मासिक किमान १८ हजार रुपये वेतन, दर नियंत्रण व किमान मासिक पेन्शन तीन हजार रुपये करणे या प्रमुख मागण्या आहेत. भारतीय रेल्वे व काही प्रमाणात टपाल विभाग यांच्यासह काही केंद्र सरकारी कर्मचारी संपात उतरणार नाहीत.

ऊर्जा क्षेत्राला धक्का

सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया, गेल, ओएनजीसी, एनटीपीसी, ओआयएल, एचएएल व भेल या कंपन्यांचे कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या कामगार संघटनांनी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे चेक वटण्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच बँकांचे व्यवहारही बंद पडू शकतील.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *