facebook
Monday , April 24 2017
Breaking News
Home / सोलापूर / अखेर पंढरीचे रस्ते नवीन करण्याचा नगर पालिकेचा निर्णय

अखेर पंढरीचे रस्ते नवीन करण्याचा नगर पालिकेचा निर्णय

प्रतिनिधी-नागनाथ सुतार

पंढरपूर –दि- २३( प्रतिनिधी )पंढरपूर शहरातील महत्वाचे असे आठ रस्ते महाराष्ट्र सुवर्ण जयंती महा-अभियान योजने अंतर्गत करण्याचा निर्णय शासन स्तरावर झाला असून त्याची अंमलबजवणीचे कामही सुरु झाले मात्र नागरीकातून सदरचे रस्ते दोन महिन्यापूर्वी केलेल्या निकृष्ट दर्जाच्या रस्त्या प्रमाणे न देता ते चांगले देण्याची मागणी नागरीकातून  होत आहे.

तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरी नगरीत लाखो भाविक दर्शनाला येतात.त्यामुळे शहरात नियमितगर्दी असते.असे भाविक महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून येत असल्याने पंढरपूर केवळ तीर्थक्षेत्रच नव्हे तर एक चांगले शहर असल्याचा संदेश सर्वत्र जावा असे पंढरपुरातील प्रत्येक नागरिकाला वाटते मात्र पंढरपूर नगर पालिकेच्या अधिकाऱ्याची नियोजन न करता कां करण्याची पद्धत आणि सत्तेतील नेत्यांची इच्छाशक्तिहीन प्रवृत्ती त्यामुळे पंढरीचा भौगोलिक विकास होत नसून केवळ कंत्राटदारांचा विकास होत आहे.वास्तविक पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्याने महाराष्ट्र शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी मिळतो परंतु या निधीचा वापर नगर पालिका योग्य पद्धतीने करत नसल्याने शहरातील नागरिकांना निकृष्ट दर्जाची कामे करून मिळत आहेत. पण अशा निकृष्ट दर्जाच्या कामावर आजतागायत कोणतीही कारवाई झाली नसल्याचा ही एक इतिहास आहे.पंढरपूर शहरातील काही रस्ते आषाढी यात्रे पूर्वी करण्यात आले होते असे रस्ते केवळ २४ तासामधेच खराब होण्याचे रेकोर्ड झाले.तरीही नगर पालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग आली नाही.याबाबत उपनगराध्यक्ष राहुल साबळे यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना लेखी तक्रार दिली असता संबंधित कंत्राटदारावर कोणतीही कारवाई केली गेली नाही.

मागील दोन दिवसा पूर्वी मुंबई येथे झालेल्या बैठकीत पंढरपूर शहरातील रस्ते करण्याबाबत चर्चा झाली असता महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्त्यांना महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महा-अभियान योजने अंतर्गत रस्त्यांना मंजुरी दिली.हे रस्ते पुढील प्रमाणे अर्बन बँक ते जुनीपेठ जुना दगडी पुल, शनैश्वर मठ ते विस्तापित नगर, धान्य गोडाऊन ते के.बी.पी.कॉलेज,पुणे रोड, अर्बन बँक,अनिल नगर ते भीमा नदी,भाई रूळ पुतळा,पद्मावती बाग ते देवमारे मळा टाकळीरोड, कुंभार गल्ली ते भीमा नदी, शहनाई गर्दन ते परिचारक नगर,आणि विठ्ठल हॉस्पिटल जवळील रस्ता असे आठ रस्ते या योजने अंतर्गत करण्याचा निर्णय झाला असून या निर्णयाचे स्वागत संपूर्ण शहरातील नागरीकातून होतंय मात्र नागरीकातून असे रस्ते केवळ नगर पालिका निवडणूक डोळ्या समोर ठेऊन निकृष्ट दर्जाचे न देता ते कायमस्वरूपी चांगले राहणारे द्यवे अशी मागणी नागरीकातून होत आहे.

Check Also

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – अमर रहे… अमर रहे, शहिद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *