facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / चंद्रभागा नदीचे वैभव असणाऱ्या महाद्वार घाटाचा रस्ता खचला, नगर पालिकेचे दुर्लक्ष !
solapur-news-2

चंद्रभागा नदीचे वैभव असणाऱ्या महाद्वार घाटाचा रस्ता खचला, नगर पालिकेचे दुर्लक्ष !

आवाज न्यूज नेटवर्क –

पंढरपूर – (नागनाथ सुतार) – विठ्ठलाच्या दर्शनाला आलेला प्रत्येक भाविक हा महाद्वार घाटावरून चंद्रभागा नदीमध्ये जात असल्याने महाद्वार घात हा वारकरी भाविकाचे वैभव मानले जाते, मात्र नगर पालिकेच्या निकृष्ट कामामुळे सध्या हा रस्ता खचल्याने भाविकांना रहदारी करणे कठीण जात आहे.

तीर्थक्षेत्र असणाऱ्या विठूरायाच्या पंढरी नगरीत लाखो भाविक दर्शनाला येतात. आलेला प्रत्येक भाविक हा चंद्रभागा नदीचे स्नान करण्यास जातो त्यासाठी पूर्वीच्या लोकांनी याच नदीवर अनेक घाट बांधले असून अशा घाटावर जाण्यासाठी मागील काही वर्षा पूर्वी नगर पालिकेने रस्ता रुंदीकरण हि केले, मात्र अशा रुंदीकरण केलेल्या भव्य रस्त्यावर चांगल्या सुविधा देऊ शकले नाहीत. कारण महाद्वार आणि महाद्वार घाट हा परिसर म्हणजे भाविकांना पंढरीचे वैभव असल्याचे मानले जाते. त्यामुळे या रस्त्यावरून रात्रंदिवस भाविकांची रहदारी असते. नगर पालिका मागील अनेक दिवसा पासून या महाद्वार घाटावरील अनेक भुयारी गटारींचे काम योग्य पद्धतीने करीत नसल्याने नेहमीच या घाटावरून गटारगंगा वाहत असते. काही दिवसापूर्वी पुन्हा याच घाटावर भुयारी गटारीचे काम करण्यात आले होते. मात्र काल झालेल्या पावसामुळे या रस्त्यावरील खोदलेला खड्डा पुन्हा खचल्याने भाविकांना रहदारी करणे कठीण झाली असल्याने भाविकातून संताप व्यक्त होत आहे. वास्तविक अशा गटारीच्या पाण्यामुळे चंद्रभागा नदीचे पावित्र्य खराब होते हे माहित असून देखील भाविकांच्या भावना दुखावण्याचे काम नगर पलीका करत असून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या “नमामी चंद्रभागा” या स्वच्छता अभियानाच्या घोषणेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.

Check Also

pal

पाळणाघरांची दोरी आता सरकारच्या हाती‌‌

खारघरमधील पाळणाघरात मुलीला अमानुष मारहाण झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. आता राज्यातील सर्व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *