facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर अनेक झाडे उगळल्याने भिंतीना धोका !
vitthal-mandir

विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर अनेक झाडे उगळल्याने भिंतीना धोका !

आवाज न्यूज नेटवर्क –

पंढरपूर – (नागनाथ सुतार) – येथील विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर अनेक झाडे-झुडपे उगवल्याने मंदिराच्या पुरातन भिंतिना ढासळण्याचा ढोका निर्माण होऊ शकतो यासाठी मंदिर समितीने त्वरित दक्षता गेण्याची गरज आहे.

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असणाऱ्या विट्ठरायाच्या पंढरी नागरी मध्ये विठ्ठलाचे मंदिर हे सर्वात पुरातन असल्याचे मानले जाते. या मंदिरावर अनेक राजांनी, सरदारांनी हल्ले केले. परंतु या मंदिराच्या कुठल्याही मूर्तीवर, भिंतीवर थोडेही विघ्न येऊ दिले नाही. या मंदिराच्या व विठ्ठलाच्या मूर्तीच्या रक्षणासाठी अनेक परिवारांनी योगदान दिले आहे. त्यामुळे आजच्या स्तिथीला हे मंदिर सुंदर आणि सुरक्षित दिसून येते. या मंदिराची देखभाल सध्या मंदिर समिती व शासकीय अधिकारी करतात. सध्या मंदिर समिती अस्तित्वात आली नसल्याने जिल्लाधिकारी व प्रांतअधिकारी या मंदिराचा कारभार पाहतात. मागील काही दिवसा पूर्वी मंदिर प्रशासनाच्या दुर्लाक्षानामुळे मंदिरातील दगडी दिपमाळ तुटल्याने अनेक भिवाकांच्या भावना दुखावल्या होत्या. त्यानंतर अनेक वर्षापूर्वीचा पुरातन गणपतीची मुर्तीही केवळ दुर्लाक्षनेच भंगली होती. त्यावेळेसही मंदिर प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांनी सारवा-सारव करून मंदिरात काहीच झाले नसल्याचा बनाव करून लोकांना वेढ्यात काढले.

विठ्ठल मंदिराच्या भिंतीवर अनेक ठिकाणी सध्या झाड उगवले असून मंदिरसमितीने अशी झाडे लहान असताना वेळेत काढणे गरजेचे आहे. हि झाडे आणखी मोठी झाल्यास मंदिराच्या भिंतिना तडे जाण्याची शक्यता असून मंदिराच्या भिंती या दगडी बांधकामातील असल्याने भिंतीला जर तडा गेला तर संपूर्ण भिंत ढासळण्याचा धोका होऊ शकतो. वास्तविक मंदिर समिती हि झाडे मोठी होण्याची वाट पाहतेय का? असे वाटते कारण परत हि झाडे तोडण्यासाठी अप्रत्यक्ष मोठे टेंडर देता येते. विठ्ठल मंदिराच्या बाहेरील बाजूस अनेक समस्या असून अशा बारीक गोष्ठीमुळे मंदिराचे वैभव खराब होत असून मंदिर प्रशासने मंदिराच्या भिंतीवरील झाडे वेळेत काढण्याची आवश्यकता आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *