facebook
Friday , February 24 2017
Breaking News
Home / Featured / दहावी, बारावी परीक्षांसाठी आधारकार्ड

दहावी, बारावी परीक्षांसाठी आधारकार्ड

मुंबई : राज्य शिक्षण मंडळाकडून दरवर्षी घेण्यात येणाऱ्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांसाठी नोंदणी करताना विद्यार्थ्यांना आता आधारकार्ड आवश्यक असेल. फेब्रुवारी, मार्च २०१७ मध्ये परीक्षा देणाऱ्यांसाठी अर्ज करताना आधारकार्ड व त्याची माहिती सादर करावी लागेल, असे शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी जाहीर केले.

शालेय विद्यार्थी आणि पालकांच्या आधारकार्ड क्रमांकांची माहिती गोळा करणे राज्याच्या शिक्षण खात्याने सुरू केले आहे. शाळाबाह्य मुलांपासून ते ‘सरल’ या ऑनलाइन यंत्रणेद्वारे माहिती गोळा करेपर्यंतच्या सर्वच टप्प्यांवर आधारकार्ड क्रमांकाचीही माहिती मागविली जात आहे. त्यातूनच दहावी-बारावीच्या परीक्षेसाठी आधारकार्ड नोंदणी आवश्यक करण्याचा निर्णय पुढे आला आहे. फेब्रुवारी-मार्च परीक्षांसाठी अर्ज भरतानाच विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक नोंदविण्याची सूचना शिक्षण मंडळातर्फे जारी परिपत्रकात करण्यात आली आहे.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *