facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / जळगाव / पोषण आहारात आढळल्या अळ्या!

पोषण आहारात आढळल्या अळ्या!

जळगाव शहराच्या शिवाजीनगरातील उर्दू शाळा क्रमांक १३ मध्ये विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात चक्क अळ्या निघाल्याचा खळबळजनक आरोप नगरसेविका गायत्री शिंदे यांनी शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत केला. त्यावर सभापती व उपायुक्तांनी चौकशीचे आदेश दिले.

मंचावर सभापती नितीन बरडे, उपायुक्त राजेंद्र फातले, शहर अभियंता दिलीप थोरात, नगरसचिव नीरंजन सैंदाणे उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला विषयपत्रिकेवरील सर्व विषय मंजूर करण्यात आले. मुख्य लेखाधिकारी चंद्रकांत वांद्रे यांची त्यांची वेतनवाढ कायम बंद करण्याच्या शिक्षेचा पुर्नविचार व्हावा यासाठी केलेल्या अपिलावर फेरचौकशीचे आदेश देण्यात आले. चौकशी योग्य पद्धतीने करावी, अश्या सूचना गणेश सोनवणे यांनी दिल्यात. सदस्या गायत्री शिंदे यांनी शिवाजीनगर शाळा क्रमांक १३ मध्ये गुरुवारी (दि.२२) वाटप करण्यात आलेल्या पोषण आहारातील खिचडीत अळ्या निघाल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी असे प्रकार वारंवार होत असल्याचेदेखील सांगितले. तसेच या भागात डेंग्यूची साथ असतानादेखील हिवताप निर्मूलन विभागाचे कर्मचारी येत नसल्याने त्यांना नोटिसा काढण्याची मागणी गायत्री शिंदे यांनी केली.
मक्तेदारांच्या बैठकीवरून संताप

अमृत योजनेच्या कामांची निविदा काढण्यापूर्वी महापालिका अधिकाऱ्यांनी मक्तेदारांची बैठक घेतल्याबद्दल नगरसेवक गणेश सोनवणे यांनी संताप व्यक्त केला. अशा बैठकींमुळे संशय निर्माण होतो, असेही त्यांनी सांगितले. या कामात पारदर्शकता दिसत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

चुकीची कामे करू नका

गणेश सोनवणे यांनी अनुकंपाच्या जागा का भरल्या जात नाहीत? याबाबत प्रश्न उपस्थित केला. स्थायी समितीने केलेले ठराव विखंडनासाठी पाठविणे योग्य नसताना चुकीची कामे का केली जात आहेत, असे म्हणत त्यांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला.

चोरांना दिले मक्ते

महापालिकेने मोकाट गुरे पकडण्याचा मक्ता ज्यांना दिला आहे, ते गुरे पकडण्याचे सोडून गुरांची चोरी करून कसायाला विकत असल्याचा आरोप नगरसेवक राजू पटेल यांनी केला. नुकताच या मक्तेदारावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे सांगून हा मक्ता रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी संबंधित अधिकारी यांनी माहिती न दिल्याने उपायुक्त फातले यांनी त्यांची कानउघाडणी केली.

Check Also

एकच पर्व, बहुजन सर्व!

‘एकच पर्व बहुजन सर्व’ चा नारा देत बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हजारोंच्या संख्येने बहुजन बांधवांनी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *