facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / सोलापूर / रकल्पग्रस्तांनी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन !

रकल्पग्रस्तांनी सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन !

प्रतिनिधी – नागेश सुतार

आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरणाने मंजूर केलेले पॅकेज देण्याची मागणी करीत प्रकल्पग्रस्तांनी फताटेवाडी येथील एनटीपीसीच्या प्रवेशद्वारावर सोमवारपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे. नव्याने मंजूर केलेले पॅकेज अन्यायकारक असल्याची तक्रार प्रकल्पग्रस्तांनी के ली आहे.मात्र असा कुठलाच करार झाला नाही असे मत एनटीपीसी जाहीर केलंय.

फताटेवाडी येथे उभारण्यात येत असलेल्या एनटीपीसी प्रकल्पासाठी होटगी स्टेशन, फताटेवाडी आणि आहेरवाडी येथील शेतकर्‍यांची १८९४ एकर जमीन संपादित करण्यात आली आहे. प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी यापूर्वी आंदोलनाद्वारे जमिनीचा मोबदला आणि अन्य बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलनेकेली होती. तत्कालीन पुनर्वसनमंत्री पतंगराव कदम यांच्यासमवेत १२ ऑगस्ट २0१४ रोजी एनटीपीसी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, राज्य पुनर्वसन प्राधिकरण यांची संयुक्त बैठक झाली होती. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या शासनाने उचलून धरल्या आणि राज्य पुनर्वसन प्राधिकरणाने पॅकेज जाहीर केले. सत्तांतरानंतर शासन आणि एनटीपीसी प्रकल्पग्रस्तांच्या पॅकेजकडे दुर्लक्ष करीत असल्याची तक्रार भारतीय किसान संघ आंदोलकांनी केली आहे.

२0१४ मध्ये राज्य पुनर्वसन प्राधिकरणाने मंजूर के लेल्या पॅकेजला कोलदांडा घालण्यासाठी शासनाने अलीकडेच एनटीपीसीसमवेत करार केला आहे. या करारात प्रकल्पग्रस्तांना ठेंगा दाखवण्यात आला आहे. त्याच्या निषेधार्थ प्रकल्पग्रस्तांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. शेतकर्‍यांना डावलून परस्पर घेतलेला निर्णय भारतीय किसान संघाला अमान्य आहे.मात्र असा कुठल्याच करार झाला नाही आणि त्याला एनटीपीसीचे समूह महाप्रबंधक एन.एन.रॉय यांनी सांगितले.

           या आंदोलनाची दखल घेऊन एनटीपीसीने २ ऑगस्ट २0१४ रोजीच्या राज्य पुनर्वसन प्राधिकरणची अंमलबजावणी करावी अन्यथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील वर्षा बंगल्यावर आंदोलक आत्मदहन करतील असा इशारा आंदोलकांनी दिलाय.

Check Also

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – अमर रहे… अमर रहे, शहिद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *