facebook
Wednesday , May 24 2017
Breaking News
Home / Manoranjan / Cultural Festivals / लालबागच्या राजाच्या खजिन्यात विक्रमी दान

लालबागच्या राजाच्या खजिन्यात विक्रमी दान

विक्रमी गर्दीसोबतच लालबागच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या दानानेही यंदा नवा विक्रमच केला आहे. सोने, चांदीच्या वस्तूंसोबतच दानपेटीत जमा झालेल्या रकमेने १० कोटी रुपयांचा आकडा पार केला असून यंदा हा आकडा १२ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी ८ कोटी ५० लाख रुपये राजाच्या खजिन्यात जमा झाले होते.

यंदा महाराष्ट्रासोबतच देशातील विविध भागातून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या संख्येत मोठी वाढ झाली. त्याशिवाय मंडळाच्या वेबसाइटला मिळालेल्या हिट्समध्येही यंदा दुपटीने वाढ झाली. भक्तांनी लालबागच्या राजावर जी श्रद्धा दाखवली आहे, त्यामुळे मंडळाची जबाबदारीही वाढली आहे. सगळ्यांना अभिमान वाटेल, असाच सामाजिक उपक्रम लवकरच मंडळाच्या वतीने आम्ही जाहीर करू, असे आश्वासन मंडळाचे सचिव सुधीर साळवी यांनी दिले.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *