facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / अहमदनगर / सरपंचांचे शेतातील घर पेटवले

सरपंचांचे शेतातील घर पेटवले

चिंचोडी येथील सरपंच संदीप रामनाथ मेंगाळ यांचे शेतातील राहते घर अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिले. घरातील साहित्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेच, शिवाय आगीने रौद्ररूप धारण केल्याने लाकडाचे वासे, कपडे, धान्य व भांडीसुद्धा वाचवता आली नाहीत.

या अगोदर, अज्ञात टोळक्याने रात्री दीडच्या सुमारास नवसू ढवळा पथवे यांच्या वस्तीवर धुमाकूळ घातला. तेथे पथवे कुटुंब जागे झाल्यामुळे त्यांनी आपला मोर्चा ढवळा पथवे यांच्या झापाकडे वळविला. त्या ठिकाणी झापातील बैल चोरण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. बैलजोडी मारकी असल्याकारणाने त्यांना सोडता आली नाही. बैलांनाही मारहाण करण्यात आल्याचे दिसत होते. नंतर संदीप यांचा झाप पेटवून देऊन या टोळक्याने पलायन केले. संदीप यांच्या घराचा पंचनामा महसूल विभागाचे कामगार तलाठी गोंदके यांनी केला असून अधिक तपास शेंडी बिटचे हवालदार वाकचौरे यांच्यासह थोरात व तळपे करत आहेत. हे कृत्य अज्ञात चार ते पाच लोकांनी केल्याचे समजते. शुक्रवारी नगर येथे मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पोलिस गेल्याने गुन्हा नोंदविण्यात आला नाही, असे हेड कॉन्स्टेबल वाकचौरे म्हणाले.

Check Also

मूलतत्त्ववादाचा देशाला धोका

‘जगभर धर्मवादाने व मूलतत्त्ववादाने गोंधळ घातला असताना देशात आज हिंदू धर्माचे राष्ट्र निर्माण झाले तर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *