facebook
Saturday , December 10 2016
Home / Featured / कानपूर कसोटीवर भारताची पकड, विजय 64*, पुजारा 50*
india-vs-new-zealand-580x351

कानपूर कसोटीवर भारताची पकड, विजय 64*, पुजारा 50*

कानपूर: विराट कोहलीच्या टीम इंडियानं न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीवर आपली पकड मजबूत केली आहे. या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारतानं दुसऱ्या डावात 1 बाद 159 धावांची मजल मारली आहे.

पहिल्या डावातील 56 धावांची आघाडी जमेस धरली, तर भारताला न्यूझीलंडवर एकूण 215 धावांची आघाडी मिळाली आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मुरली विजय 64 धावांवर तर चेतेश्वर पुजारा 50 धावांवर खेळत होता.

भारतीय गोलंदाजांची कमाल

दरम्यान काल बॅकपूटवर गेलेल्या टीम इंडियांने आज कानपूर कसोटीत कमबॅक केलं. कारण कालच्या एक बाद 152 अशा मजबूत स्थितीतून, न्यूझीलंडचा संपूर्ण डाव 262 धावांत गुंडाळल. त्यामुळे भारताला 56 धावांची आघाडी मिळाली.

भारताकडून रवींद्र जाडेजाने 5 तर अश्विनने 4 फलंदाजांना माघारी धाडत, न्यूझीलंडचा डाव गुंडाळण्यात मोलाचा वाटा उचलला.

रवींद्र जाडेजानं 73 धावांत पाच फलंदाजांना माघारी धाडलं. तर अश्विननं 93 धावांच्या मोबदल्यात चार विकेट्स काढल्या.

अश्विन आणि रवींद्र जाडेजानं प्रभावी मारा करुन कानपूर कसोटीच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाला जबदरस्त कमबॅक करुन दिलं. न्यूझीलंडनं उपाहारापर्यंत पाच बाद 238 धावांची मजल मारली होती. मात्र त्यानंतर जाडेजा – अश्विन जोडीने अवघ्या 24 धावात न्यूझीलंडचा उर्वरीत अर्धा संघ माघारी धाडला.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *