facebook
Sunday , December 11 2016
Home / सोलापूर / पंढरपूर शहर पोलिसांची दुचाकी वाहनावर धडक कारवाई |
%e0%a4%aa%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a4%b0

पंढरपूर शहर पोलिसांची दुचाकी वाहनावर धडक कारवाई |

पंढरपूर –दि-२४ ( प्रतिनिधी -नागेश सुतार  ) पंढरपूर शहरातील वाहनांच्या वाढत्या चोऱ्यांच्या प्रकाराला आळा घालण्यासाठी वाहतूकशाखेच्या पोलिसांनी आज शहरातील सुमारे तीनशे बिगर नंबरच्या दुचाकी वाहनावर कारवाई केली असून अशी वाहने सोडवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये लोकांची मोठी गर्दी दिसून येत होती.

unnamed

 

 

 

 

 

पंढरपूर शहरा मध्ये मागील काही दिवसामध्ये दुचाकी वाहनांच्या चोऱ्या मध्ये वाढ झाल्याने नागरीकातून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.अशाचोऱ्या रोखण्यासाठी शहर पोलिसांनी शहरातील बिगर नंबर प्लेटच्या,आणि बिगर लायसनच्या वाहनावर कारवाईची मोहीम सुरु केली.तरीही शहरातील  वाहने चोरीच्या घटनेत कमी झाली  नव्हती. उप विभागीय पोलीस अधिकारी निखील पिंगळे यांनी या सर्व प्रकारचा अभ्यास करून शहरातील जेवस्ध्या बिगर नंबर प्लेटच्या गाड्या आहेत त्या तपासणीची मोहीम हाती घेतली.आज दिवसभर पंढरपूर शहरातील प्रत्येक भागामधून वाहतूक शाखेच्या पोलिसांनी व्यापक मोहीम हाती घेऊन ज्या बिगर नंबर आणि बिगर कागदपत्राच्या वाहनावर कारवाई सुरु केली असता या कारवाई मध्ये सुमारे तीनशे वाहनावर कारवाई करून त्या गाड्या तपासण्यात आल्याअसून ज्या संशियीत गाड्या आहेत त्या ताब्यात घेण्यात आल्या असून त्याचा तपास सुरु आहे.आज शहरातील अनेक नागरिकांनी आपली गाड्या सोडवण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये मोठी गर्दी केल्याचे दिसत होते.  ज्या बिगर नंबरच्या गाड्या पकडल्या अशा गाड्यांना तत्काळ नंबरप्लेट बसविण्याचे काम करण्यात आल्याने नागरीकातून बिगर नंबरच्या गाड्या चालवणे हा गुन्हा असल्याचे समजल्याने अनेक लोकांनी आपल्या वाहनावर नंबर टाकण्यासाठी रेडीयम आर्टच्या दुकानी गर्दी केली होती.

याबाबत वाहतूक शाखेचे स.पो.नि.गोपाळचावडीकर यांना विचारले असता ते म्हणाले कि शहरातील नागरिकांना आमच्या कारवाईचा त्रास होतोय नक्की मात्र हि कारवाई जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी नसून चोरीचे आरोपी आणि चोरीचे वाहने शोधण्यासाठी आहे.तरी

Check Also

solapur-new-2

शहिद मेजर कुणाल गोसावी यांच्यावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार

आवाज न्यूज नेटवर्क – पंढरपूर – (प्रतिनिधी – नागनाथ सुतार) – अमर रहे… अमर रहे, शहिद …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *