facebook
Saturday , December 10 2016
Home / कोल्हापूर / पैसे घेऊन शिक्षकांना पुरस्कार
13516340_115290022235705_871404053873110509_n

पैसे घेऊन शिक्षकांना पुरस्कार

प्राथमिक शिक्षण समितीच्या कारभारावरून सदस्यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. अधिकारी पैसे खाऊन पुरस्कार देतात असा आरोप स्थायी समिती सभेत ताराराणी आघाडीचे गटनेते सत्यजित कदम यांनी केला. डॉ. उदय भट हे व्यवस्थित काम करत नसल्याने त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणखी चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसविण्यात येणार आहे. सिग्नलमध्ये मुंबईच्या धर्तीवर डीएनसीप्रमाणे वेळ (टायमिंग) ठरवले जाईल. नवीन सिग्नलबाबत कार्यवाही सुरू असल्याची माहिती स्थायी समिती सभेत अधिकाऱ्यांनी दिली. स्थायी समिती सभापती मुरलीधर जाधव बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

महापालिका शाळांची दुरवस्था झाली आहे. मात्र प्रशासनाधिकाऱ्यांचे त्याकडे लक्ष नाही. स्थायी समितीच्या बैठकीला प्रशासनाधिकारी प्रत‌िभा सुर्वे हजर राहत नाहीत. शिक्षक पुरस्कार कोणत्या निकषावर दिले? जिल्हा नियोजन समितीकडून ई लर्निंगसाठी ४० लाख रुपयांचा निधी प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे निधी परत गेला. या प्रकरणी जबाबदार अधिकारी, ठेकेदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली.
४० हजार रुपयांसाठी जेसीबी बंद असल्याचे दीपा मगदूम यांनी निदर्शनास आणले. नगरसेविका जयश्री चव्हाण यांनी शिक्षण विभागाकडील वैद्यकीय बिलांचा प्रश्न मांडला. त्यावर नवीन अध्यादेशानुसार आरोग्य अधिकारी, आयुक्त यांच्याकडून वैद्यकीय बिलांची तपासणी झाल्यानंतर देण्यात असल्याचे उत्तर अधिकाऱ्यांनी दिले. सुनील पाटील यांनी मटण मार्केट, कोंबडी बाजार येथील अतिक्रमणाकडे लक्ष वेधल्यानंतर लवकरच अतिक्रमण विरोधी मोहीम राबविण्यात येईल, असे प्रशासनाने सांगितले. नगरसेविका रुपाराणी निकम यांनी झोपडपट्टीधारकांना जागा खरेदी का दिली जात नाही असा प्रश्न उपस्थित केला. मोकाट कुत्री, डुकरे पकडण्यासाठी मोहीम घेऊ. तसेच कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी जागा मिळाली असल्याचे सांगितले.

प्रवेशद्वारावर झळकणार शहराची वैशिष्ट्ये

शहराच्या प्रवेशाची ठिकाणे आणि प्रवेशद्वारांचे सौंदर्य खुलणार आहे. या ठिकाणी शहराच्या वैशिष्ट्यांवर आधारित पोस्टर्स लावण्याचा प्रशासनाचा विचार आहे. सदस्या उमा इंगळे यांनी प्रवेशद्वारावर होर्डिंग्ज न लावता शहराची वैशिष्ट्ये दर्शविणारे पोस्टर्स लावण्याची सूचना केली.

रविवारपर्यंत मंडप काढा, अन्यथा कारवाई

नगरसेविका सूरमंजिरी लाटकर यांनी शहरातील रस्त्यावरील मांडवाकडे लक्ष वेधत तत्काळ रस्ते खुले करण्याची सूचना केली. प्रशासनाने, मंडळांना मंडप काढून घेण्याच्या सूचना केल्या आहेत. रविवारपर्यंत मंडप काढले नाहीत तर कारवाई होईल. पुढील वर्षासाठी पर्यावरणपूक गणेशोत्सव व विना खड्डा मांडव यासाठी प्रयत्न असल्याचे सांगितले.

गांधी मैदानाची डागडुजी

१५ ऑक्टोबर रोजी गांधी मैदान येथून मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. गांधी मैदान येथे दलदल आहे, रस्ते खराब आहेत. नवरात्र उत्सवापूर्वी रस्त्यांची डागडुजी, स्वच्छता करण्याची सूचना नगरसेविका शोभा बोंद्रे यांनी केली. गांधी मैदानातील गवत काढून डागडुजी केली जाईल. तसेच नवरात्र उत्सवापूर्वी रस्त्यांची दुरस्ती केली जाईल असे उत्तर प्रशासनाने दिले.

Check Also

news-3

नेटबँकिंगचा वाढला टक्का

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर – कॅशलेस व्यवस्थेला पर्याय म्हणून अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *