facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / उरीः ‘हा’ घ्या पाकचा बुरखा फाडणारा पुरावा!

उरीः ‘हा’ घ्या पाकचा बुरखा फाडणारा पुरावा!

उरी दहशतवादी हल्ल्यानंतरही नेहमीप्रमाणे ‘आम्ही नाही त्यातले’ असा कांगावा करणाऱ्या पाकिस्तानला उघडं पाडणारा एक सबळ पुरावा तपास संस्थेच्या हाती लागला आहे. दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेल्या दोन वायरलेस सेटवर उर्दूमध्ये ‘बिल्कुल नया’ असं लिहिलं आहे. त्यामुळे हे हल्लेखोर पाकिस्तानचेच होते, यावर शिक्कामोर्तबच झालं आहे.

उरी हल्ल्यातील चारही दहशतवाद्यांचा खात्मा केल्यानंतर, त्यांच्याकडे सापडलेल्या ४८ वस्तू लष्कराने राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवल्या आहेत. त्यातच हे दोन वायरलेस सेटही आहेत. ते जपानमधील आयकॉम कंपनीचे आहेत. या कंपनीकडून एनआयएनं माहिती मिळवली आहे. कुठल्याही देशात वायरलेस सेट सुरक्षा एजन्सीला विकले जातात. हे सेट पाकिस्तानला विकण्यात आले होते का, याबद्दल खातरजमा करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. त्याबाबत शहानिशा करून, ती माहिती पाकिस्तानी अधिकाऱ्यांना दिली जाईल, असं गृह खात्यातील सूत्रांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला सांगितलं.

उरीतील दहशतवाद्यांनी आपल्या जीपीएस डिव्हाइसमधील डेटा उडवून टाकला असला, तरी त्यावरील क्रमांकावरून हे डिव्हाइस गार्मिन या अमेरिकन कंपनीतून खरेदी केल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळे तो तपासही सोपा झाला आहे. तसंच, पाकिस्तानी कंपनीची ज्यूस पॅकेट्स दहशतवाद्यांकडे सापडली आहेत.

लष्करानं दोन नकाशेही एनआयकडे सोपवले आहेत. त्यापैकी एक जळालेल्या अवस्थेत आहे. परंतु, तो कसला नकाशा आहे हे शोधण्याचा प्रयत्न नॅशनल टेक्निकल रिचर्स लॅबमध्ये सुरू आहे. मात्र, दहशतवाद्यांकडील आय कॉल या भारतीय कंपनीच्या मोबाइलनं एनआयएला थोडं कोड्यात टाकलं आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *