facebook
Saturday , April 29 2017
Breaking News
Home / Featured / एकनाथ खडसेंनी ‘रामटेक’ सोडला

एकनाथ खडसेंनी ‘रामटेक’ सोडला

भोसरी येथील एमआरडीसी जमीनखरेदी प्रकरणात मं‌‌त्रिपद गमावावे लागलेले माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मलबार हिल येथील ‘रामटेक’ हा सरकारी बंगला सोडला आहे. मं‌त्रिपद गेल्यानंतर ते सरकारी दराने भाडे भरून हा बंगला वापरत होते.

भोसरी जमीनखरेदी तसेच भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे खडसेंना मं‌त्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महसूल, कृषी, दुग्धविकास, अल्पसंख्याक आदी महत्त्वाची खाती त्यांच्याकडे होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मं‌त्रिमंडळात दुसरा क्रमांक खडसे यांचा होता. मंत्रालयात सहाव्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या दालनालगतच दालन आणि कार्यालय खडसे यांना देण्यात आले होते. उपमुख्यमंत्रिपदासाठी मलबार हिल येथील ‘रामटेक’ बंगलाही त्यांना देण्यात आला होता. मंत्रिपद गमावावे लागल्यानंतर खडसे ‘रामटेक’वरच राहत होते. त्यांनी या बंगल्याचे रीतसर भाडेही भरले आहे. त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांनी चौकशी सुरू केली आहे. नागपूर येथे ही चौकशी सुरू आहे. परंतु या न्यायालयीन आयोगाने चौकशीसाठी आणखी तीन महिन्यांची मुदत राज्य सरकारकडे मागितली आहे. तसेच उच्च न्यायालयातही त्यांच्याविरोधातील याचिकाची सुनावणी सुरू झाली आहे. खडसे यांनी गेल्याच आठवड्यात रामटेक परत करत असल्याचे पत्र सरकारला दिले आहे. तेथून मानही हलविले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *