facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / मुंबई / तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

तिन्ही मार्गांवर आज मेगाब्लॉक

मध्य, हार्बर आणि पश्चिम अशा तिन्ही मार्गांवर आज, रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. म.रे.च्या मुंलुड ते माटुंगादरम्यान अप धीम्या मार्गावर सकाळी ११.२० ते दुपारी ४.२० वाजेपर्यत दुरुस्तीची कामे चालणार आहेत. यादरम्यान मुंलुड ते माटुंगा दरम्यान नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकात लोकल गाड्या थांबणार नाहीत. डाउन जलद मार्गावरील लोकल सकाळी १०.०८ ते दुपारी २.४२ या वेळेत २० मिनिटे, तर अप जलद मार्गावरील लोकल सकाळी ११.२२ ते दुपारी ३.२८ या वेळेत १५ मिनिटे उशिराने धावतील.

हार्बरवर कुर्ला ते मानखुर्द स्थानकांदरम्यान अप आणि डाऊनवर दुरुस्तीसाठी सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यत ब्लॉक चालणार आहे. यादरम्यान कुर्ला ते मानखुर्द दरम्यानची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक सकाळी १०.२० ते दुपारी ३.४८ वाजेपर्यत पूर्णपणे बंद राहणार आहे. दरम्यान, पश्चिम रेल्वेवर बोरीवली ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत अप आणि डाऊन धीम्या मार्गांवर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *