facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / औरंगाबाद / …त्यांच्या गुणपत्रिकेतून ‘फेल’ शब्द गळाला!

…त्यांच्या गुणपत्रिकेतून ‘फेल’ शब्द गळाला!

माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावी पुरवणी परीक्षेतील गुणपत्रिकांचे शनिवारी वाटप करण्यात आले. या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरून ‘फेल’ हा शब्द हद्दपार झाला असून, एक किंवा दोन विषय राहिले असतील तर ‘एटीकेटी’, तर तीन पेक्षा अधिक विषय राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कौशल्य विकासास पात्र असा उल्लेख करण्यात आला आहे.

शिक्षण मंडळातर्फे १८ जुलै ते ३ ऑगस्टदरम्यान दहावी पुरवणी परीक्षा घेण्यात आली. त्याचा निकाल ३० ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. त्यानंतर आज शाळांना विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे वाटप करण्यात आले. त्यानंतर सोमवारी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष त्याचे शाळांमधून केले जाणार आहे. यंदापासून गुणपत्रिकेवरून नापासचा शिक्का पुसला गेला आहे. त्यामुळे गुणपत्रिका पाहण्यासाठी शिक्षकांमध्ये उत्सुकता पहायला मिळाली. दोन विषयात नापास असेल, तर त्याला ‘एटीकेटी’ दिली जाते. ज्यामुळे तो विद्यार्थी अकरावीला प्रवेश घेऊ शकतो. तीनपेक्षा अधिक विषयात नापास विद्यार्थ्यांना यंदापासून कौशल्य विकास सेतू अंतर्गत कौशल्य विकासाचे धडे दिले जाणार आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर ‘इलिजीबल फॉर ओन्ली स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम’ असा उल्लेख केला आहे. औरंगाबाद विभागातून पुरवणी परीक्षेस १६ हजार ५२२ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी ५ हजार २८५ विद्यार्थी पास झाले आहेत.
अन् शिक्षक गोंधळले

तीन विषयांत नापास विद्यार्थ्यांना पॉलिटेक्निक कॉलेजांच्या मदतीने कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यात पंधरा अभ्यासक्रमाचा समावेश आहे. प्रशिक्षणासाठी विद्यार्थ्याची आवड लक्षात घेत, शाळांनाच नोंदणी प्रक्रिया करावयाची आहे. आठ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्याबाबत गुणपत्रिका वितरणासह शिक्षकांना प्रशिक्षणही देण्यात आले. यावेळी शिक्षण उपसंचालक भाऊसाहेब तुपे यांची प्रमुख उपस्थिती होती. शिक्षकांना सुहास अंबेकर, शेख जमील, डॉ. हरी कोकरे, आर. एस. पाटील, म्हस्के, जाधव यांनी मार्गदर्शन केले. नोंदणीसाठी अॅप तयार करण्यात आला असून अॅप डाऊनलोड करण्यापासून नोंदणीपर्यंतची प्रक्रिया सांगण्यात आली. काहीवेळ सर्व्हर डाऊन असल्याने अॅप डाऊनलोड होत नव्हते. हे अडथळे निर्माण होत असल्याने शिक्षकही गोंधळले.

 

Check Also

गोवंश हत्याबंदीला सुप्रीम कोर्टात आव्हान

गोवंश हत्याबंदी दुरुस्ती कायदा रद्द करण्याबाबतची जनहित याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली होती. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *