facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / नाशिक / पूर्व विदर्भात दूषित पाण्याचे दहा बळी

पूर्व विदर्भात दूषित पाण्याचे दहा बळी

एकीकडे नागपूर शहरात डेंग्यूने कहर केला आहे. तर दुसरीकडे नागपूर विभागातील बहुतांश सर्वच जिल्ह्यांत जलजन्य आजारांनी उच्छाद मांडला आहे. दूषित पाणी पुरवठ्यामुळे पूर्व विदर्भात घरोघरी पोटाच्या आजाराचे रुग्ण वाढले आहेत. हगवण, कॉलरा, अतिसार, गॅस्ट्रो इंटरायटीसने आतापर्यंत दहाहून अधिक जणांचा बळी घेतला आहे. या आजारांचा सर्वाधिक विळखा हा गोंदिया, भंडारा आणि नागपूर जिल्ह्याभोवती पडला आहे. या तीन जिल्ह्यांत सध्या शेकडो रुग्णांनी खाट धरली आहे.

कुही, पारशिवनी, उमरेड, काटोल, नरखेड, तालुक्यांमध्ये हगवण, गॅस्ट्रो, अतिसाराचे जवळजवळ ७०० रुग्ण सापडले आहेत. नागपूर जिल्ह्याच्या खालोखाल भंडाराचा क्रमांक लागतो. भंडारा जिल्ह्यात मोहाडी, भंडारा, तुमसर तालुक्यांमध्ये जलजन्य आजारांचा उद्रेक झाला आहे. या तालुक्यांमध्येही हगवण, अतिसाराचे ३००हून अधिक रुग्ण आढळले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात नागभीड, कोरपना तर गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात गॅस्ट्रोची साथ पसरली आहे. या दोन्ही
जिल्ह्यात गॅस्ट्रोचे २०० हून अधिक रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आरोग्य विभागाने पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये केलेल्या तपासणी आतापर्यंत १७००हून अधिक रुग्ण दूषित पाणीपुरवठ्यामुळे बाधीत झाल्याचे स्पष्ट झाले आहेत.

मलेरियाचाही मुक्काम

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे पूर्व विदर्भात डासांचा प्रकोप वाढला आहे. त्यामुळे कीटकजन्य आजारदेखील ठाण मांडून आहेत. पूर्व विदर्भात आतापर्यंत मलेरियाची लक्षणे आढळलेल्या १५ लाख २८ हजार १३६ संशयितांच्या रक्ताचे नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ३ हजार ७३० जणांना मलेरियाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. गेल्या वर्षी आरोग्य विभागाने १२ लाख ७९ हजार जणांच्या रक्ताचे नमुने तपासले होते. त्यात १३ हजार जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या होत्या. मलेरियाचा सर्वाधिक उद्रेक गडचिरोली जिल्ह्यात आहे. एकट्या गडचिरोलीत २७५३ जणांच्या चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्या खालोखाल गोंदियात ५२०, चंद्रपुरात ३३० मलेरियाचे रुग्ण उपचार घेत आहेत.

Check Also

मार्केट फुलले; चेहरे उतरले

रविवारच्या साप्ताहिक सुटीनंतर सोमवारी येवला कृषी उत्पन्न बाजार समितीचे येवला मुख्य बाजार आवार लाल कांदा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *