facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / मुंबई / मराठा समाजाला आरक्षण देणारच- मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण देणारच- मुख्यमंत्री

मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजुने सरकार आहे, त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देणारच अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत एका कार्यक्रमात दिली.

मराठा क्रांती मोर्चा आयोजकांनी चर्चेसाठी यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट मध्ये माथाडी नेते अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त आयोजित मेळाव्यात ते बोलत होते.

 मराठा समाजाच्या ५ लाख तरुणांना कौशल्य विकासाचं शिक्षण दिलं जाईल, असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

माथाडी कामगारांसाठी राज्यभर घरकुल योजना राबविणार असून माथाडी कामगारांचे सर्व प्रलंबित प्रश्न सोडविण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *