facebook
Monday , February 27 2017
Breaking News
Home / पुणे ग्रामीण / विमानतळ गेल्यामुळे खेडमध्ये वाटले पेढे

विमानतळ गेल्यामुळे खेडमध्ये वाटले पेढे

राजगुरूनगर : खेड तालुक्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अखेर पुरंदर तालुक्यात होत असल्यामुळे कोये-धामणे-पाईट गावातील शेतकऱ्यांनी पेढे वाटून व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
भामा-आसखेड धरणालगतच असणाऱ्या या गावांतील जमिनीवर विमानतळ प्रस्तावित होते; परंतु या विमानतळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान हाोईल, या भीतीमुळे शेतकऱ्यांचा या विमानतळाला तीव्र विरोध होता. विमानतळ होऊ नये म्हणून संबधित शेतकऱ्यांनी अनेकवेळा आंदोलने केली होती. ज्या जमिनीवर हे विमानतळ प्रस्तावित होते, ती बहुतांश जमीन बागायत असल्यामुळे जमीन देण्यास शेतकरी तयार नव्हते. ही जागा सपाट असून विमानतळास योग्य असल्याचा अहवाल संबंधित विभागाने सरकारला दिला होता.
या वेळी पप्पू राळे, जयसिंग दरेकर, बळवंत डांगले, काळूराम कोळेकर, अंकुश कोळेकर, पोपट राळे, अरुण करंडे, राजू कोळेकर, सुनील राळे, साहेबराव राळे, माऊली कोळेकर, संजय कोळेकर आदी शेतकरी उपस्थित होते.

 

 

Check Also

माऊली मंदिर भिलजी ता. अलिबग ते देवाची आळंदी पायी पालखी

आवाज न्यूज नेटवर्क – नायगाव-कामशेट – (प्रतिनिधी – नागेश जाधव) – २२ नोव्हेंबरला माऊली मंदिर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *