facebook
Saturday , December 3 2016
Home / Featured / ‘आक्रमण झाल्यास चीन पाकिस्तानबरोबर’
03

‘आक्रमण झाल्यास चीन पाकिस्तानबरोबर’

कोणतेही परकीय आक्रमण झाले, तर आपण मदत करू, असे आश्वासन चीनने पाकिस्तानला दिले असून, काश्मीरसंबंधी पाकिस्तानच्या भूमिकेलाही चीनने पाठिंबा दिला असल्याचा दावा एका अहवालातून करण्यात आला आहे.

चीनने हा संदेश एका उच्चस्तरीय बैठकीत दिला आहे, असे वृत्त ‘डॉन’ या वृत्तपत्राने पाकिस्तानातील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शहबाज शरीफ यांच्या हवाल्याने दिले आहे. ‘कोणतेही परकीय आक्रमण झाल्यास आमचा देश पाकिस्तानला संपूर्ण पाठिंबा देईल,’ असे लाहोरमधील चीन दूतावासातील कौन्सूल जनरल यू बोरेन यांनी म्हटल्याचे शहनवाज शरीफ यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ‘काश्मीरच्या मुद्द्यावर आम्ही पाकिस्तानच्या बाजूने आहोत आणि बाजूने राहू. काश्मीर आणि व्याप्त काश्मीरमधील निःशस्त्र काश्मिरींवर झालेल्या अत्याचारांना कोणतेही समर्थन नाही. हा मुद्दा का‌श्मिरींच्या मतांवरच हाताळण्यात आला पाहिजे,’ असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *