facebook
Wednesday , December 7 2016
Home / Featured / कश्मीर हमारा नही, कश्मिरी ओंका है!
18

कश्मीर हमारा नही, कश्मिरी ओंका है!

‘कश्मीर हमारा है’, असा नारा देणाऱ्यांनी वास्तव समजून घेणे आवश्यक आहे. काश्मीर कुणाचाही नाही, तो फक्त काश्मिरी लोकांचा आहे. तिथल्या लोकांवर गोळीबार करणे हा उपाय नाही. उलट तेथील सैन्य दल हटविण्यात यावे, तेथील लोकांना नेमके काय हवे आहे याकरिता त्यांचे मतदान घ्यावे आणि त्यांच्या इच्छेनुसार निर्णय घ्यावा, असे मत भारतीय मार्क्सवादी लेनीन कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस के. एन. रामचंद्रन यांनी व्यक्त केले.

पक्षातर्फे राष्ट्रभाषा भवन येथे ‘नक्षलबारीची प्रासंगिकता तेव्हा आणि आज’ या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राकरिता ते शहरात आले असता त्यांनी ‘मटा’शी संवाद साधला. ते म्हणाले ‘आज काश्मीरातील परिस्थिती अत्यंत वाईट आहे.
त्यात देशात मोदी सरकार आल्याने फॅसिस्ट विचारधारा फोफावते आहे. ही विचारधारा हे वामपंथी आंदोलनापुढे सगळ्यात मोठे आव्हान आहे. त्याकरिता पक्षातर्फे जनतेला एकत्रित करून त्यांच्याच जनजागृती करण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत.’

नक्षलबारीबद्दल बोलताना ते म्हणाले ‘देशात शेतकऱ्यांवर आणि गरिबांवरील अत्याचाराची सीमा पार झाल्यावर नक्षलबारीमध्ये उठाव झाला. हा उठाव पुढे हिंसक झाला आणि त्याला वेगळे वळण आले तो भाग वेगळा आहे. परंतु देशातील भांडवलशाहीच्या विरोधात उठवलेला तो आ‍वाज होता. आजही देशात भांडवलशाहीने थैमान घातले आहे. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे जनतेला एकत्रित करून त्यांच्यात जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने पक्षातर्फे ‘चलो नक्षलबारी’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याकरिता २०१७ साली या उठावा पन्नास वर्षे पूर्ण होत असून मे २०१७ मध्ये नक्षलबारी एका मोठ्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याकरिता देशभरात या प्रकारचे चर्चासत्र आयोजित करून लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जात आहे’, असेही त्यांनी सांगितले. यावेळी पक्षाच्या बंगाल कार्यकारिणीचे सचिव प्रदीपसिंह ठाकूर, संजय सिंग आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Check Also

wari

नागपुरात रंगणार ‘शिक्षणाची वारी’

विदर्भातील शिक्षकांच्या कल्पकतेतून साकारलेल्या शैक्षणिक प्रयोगांचे प्रदर्शन नागपुरात गुरुवारपासून सुरू होणार आहे. शिक्षणाची वारी म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *