facebook
Saturday , December 3 2016
Home / मुंबई / ‘गोल्डन अवर्स’बाबत मालवाहतूकदारांमध्ये नाराजी
12

‘गोल्डन अवर्स’बाबत मालवाहतूकदारांमध्ये नाराजी

वाहतूककोंडी टाळण्यासाठी विकेंड तसेच सुट्ट्यांच्या दिवशी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे विशिष्ट वेळेत (गोल्डन अवर्स) बंद ठेवला जात आहे. यामुळे वाहतूककोंडीतून काहीसा दिलासा मिळाला असला तरी, या निर्णयाविरोधात मालवाहतूकदारांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी वेगळे कॉरिडोर निर्माण न करता अशाप्रकारे बंदी घालण्याच्या निर्णयामुळे होणारे आर्थिक नुकसान कोण भरून देणार, असा सवाल केला जात आहे.

एक्स्प्रेस वेच्या तिन्ही मार्गिकांवर सर्रास अवजड वाहने प्रवास करतात. परिणामी यावर वाहतुकीची कोंडी होते. विकेंड तसेच सुट्ट्यांच्या दिवसांत या रस्त्यावर अनेक किलोमीटर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागतात. ही कोंडी फोडण्यासाठी महामार्ग पोलिसांच्या ठाणे आणि पुणे उपअधीक्षकांनी अशा काळात अवजड वाहनांना बंदी घालण्याची ‘गोल्डन अवर्स’ ही संकल्पना दोन आठवड्यांपासून राबवण्यास सुरुवात केली आहे.
दर आठवड्याच्या शुक्रवारी सायंकाळी पाच ते रात्री आठ व शनिवारी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या, तर रविवारी दुपारी चार ते रात्री आठ आणि सोमवारी सकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय सलग दोन सुट्ट्या आल्यास सुट्ट्या सुरू होण्याच्या आदल्या दिवशी सायंकाळी पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या आणि सुट्ट्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गिकेवर बंदी घालण्यात आली आहे.

या निर्णयामुळे शनिवार, रविवारी व सोमवार या तीन दिवसांत मिळून तब्बल १४ तास अवजड वाहनांना एक्स्प्रेस वे बंद राहणार आहे. ‘गोल्डन अवर्स’ संकल्पनेला उत्तम प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मोहीम पुढेही सुरू राहणार आहे, असे वाहतूक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक आर. के पद्मनाभन यांनी स्पष्ट केले आहे. मात्र या निर्णयामुळे अवजड वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

व्यवहारावर परिणाम

न्हावा शेवा बंदरात आलेला माल याच मार्गावरून अन्य भागांत पोहोचता केला जातो. अशा वेळी १३ तास वाहनांना थांबवून ठेवले, तर पुढल्या प्रवासावर आणि एकूणच सगळ्याच व्यवहारावर विपरित परिणाम होण्याची भीती असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पैठणकर यांनी बोलून दाखवली.

आम्ही पुण्या-मुंबईला सहलीला जात नाही. जीवनावश्यक माल तसेच उद्योगांना लागणारा माल देशाच्या एका भागातून दुसऱ्या भागात पोहोचवतो. मग अशावेळी आमचाही विचार करणे आवश्यक होते, पण आम्हाला खिजगणीतही धरले नाही.

– प्रवीण पैठणकर, अध्यक्ष-महाराष्ट्र हेवी व्हेईकल अँड इंटरस्टेट कंटेनर ऑपरेटर्स असोसिएशन

 

Check Also

news-1

दहावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – दहावीची परीक्षा सर्वच विद्यार्थ्यांच्या करिअरमधली अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *