facebook
Saturday , December 10 2016
Home / जळगाव / तरुणाने धरली पोलिसाची कॉलर
crime

तरुणाने धरली पोलिसाची कॉलर

नियमभंग करणाऱ्या रिक्षाचालकाला मेमो का दिला? असे विचारत वाहतूक पोलिसाशी हुज्जत घालत त्याची कॉलर पकडणाऱ्या तरुणाला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. स्टेट बँक चौकात दुपारी ही घटना घडली.

स्टेट बँक चौकात शनिवारी दुपारी वाहतूक पोलिस महेंद्र बोरसे यांची ड्युटी होती. यावेळी नियमभंग करणारे रिक्षाचालक अनिल राठोड व गोकुळदास राठोड यांना दंडाचा मेमो बोरसे यांनी दिला मात्र, राठोड यांनी हा मेमो फाडण्याचा प्रयत्न केला. त्यावरून त्यांचा बोरसे यांच्याशी वाद झाला. याचवेळी घटनास्थळी विनीत आहुजा (गणेशनगर) हा तरुण आला. त्याने बोरसे यांना जाऊ द्या नां साहेब, त्या दोघांना कशाला त्रास देता अशी विनंती केली. त्यावर बोरसे यांनी तुझा काय संबंध असे विचारल्यावरून आहुजा व त्यांच्यात वाद झाला. या वादातून विनीत आहुजा याने आपली कॉलर पकडल्याची माहिती बोरसे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. हा वाद वाढत असताना तिथे पोहोचलेल्या इगल पथकाने एक रिक्षाचालक व विनीत आहुजा यांना ताब्यात घेऊन जिल्हापेठ पोलिसात आणले. बोरसेदेखील तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात गेले. आहुजाला जिल्हापेठ पोलिसांनी ताब्यात घेतल्यावर त्याच्या मित्रांनी जिल्हापेठ पोलिसात धाव घेतली. विशेष म्हणजे एमआयडीसी पोलिस ठाण्यातील अनेक कर्मचारी आपल्या मित्राची बाजू मांडण्यासाठी पोलिस ठाण्यात आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *