facebook
Monday , December 5 2016
Home / नाशिक / महामार्गावर ‘भगवाच’
maratha-nashik

महामार्गावर ‘भगवाच’

‘एक मराठा लाख मराठा’चा एल्गार करीत मालेगाव शहर व तालुक्यातून लाखो मराठा समाज बांधव नाशिककडे शनिवारी पहाटेच रवाना झाले. लहान मोठी अशी हजारो वाहने महामार्गावर पहाटे पाच वाजेपासूनच धावताना दिसत होती. अवघ्या तासाभरात संपूर्ण महामार्ग भगवामय झाल्याचे चित्र मालेगाव, उमराणा, सौंदाणापासून नाशिककडे दिसत होते. वाहनांची रांग जसजशी नाशिककडे पुढे सरकत होती तसतसे ‘जय भवानी, जय शिवाजी,’ ‘एक मराठा लाख मराठा’च्या घोषणांनी महामार्ग दणाणला होता.

तालुक्यातील सौंदणेपासूनच स्वयंसेवकानी पाणी नाश्ता यांचे पॅकेज वाटप करण्याची सोय केली होती. नाशिकच्या दिशेने येणाऱ्या वाहनांची संख्या प्रत्येक गावानंतर वाढत होती. यात ट्रक, टेम्पो, कार ते अगदी दुचाकी वाहनांचा ताफाच फक्त दूरदूरपर्यंत नजरेस पडत होता.
चांदवड, पिंपळगाव टोल फ्री

चांदवड, पिंपळगाव, ओझर गावांच्या सुरुवातीस स्वागत कमानी भगवे ध्वज यामुळे मोर्चेकरींचा उत्साह वाढत होता. एरवी सक्तीने टोल वसूल करण्यासाठी चर्चेत असलेला पिंपळगाव चांदवड येथे वाहने टोल फ्री सोडण्यात येत होती. मालेगाव नाशिक दरम्यान हजारो वाहने रस्त्यावरून जात असली तरी कुठेही शिस्तभंग वा वाहतूक खोळंबा झाला नाही.

Check Also

news-10

पाचशेच्या नोटांची छपाई नाशिकमध्येच

आवाज न्यूज नेटवर्क – नाशिक – नाशिकरोडच्या करन्सी प्रेसमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचे उत्पादन थांबवले जाणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *