facebook
Thursday , December 8 2016
Home / देश / विदेश / मोदींची तिन्ही दलप्रमुखांशी भेट
01

मोदींची तिन्ही दलप्रमुखांशी भेट

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पुढील दिशा ठरविण्यासाठी शनिवारी देशाच्या तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांची भेट घेतली. ‘साउथ ब्लॉक’मधील ‘वॉर रूम’मध्ये ही बैठक झाली. हे दालन संरक्षणविषयक संवेदनशील परिस्थिती निर्माण झाली, तर महत्त्वपूर्ण बैठकीसाठी वापरण्यात येते.

पंतप्रधान कार्यालय आणि संरक्षण दलांकडून या बैठकीतील चर्चेविषयी काटेकोर गुप्तता बाळगली असली, तरी बैठकीत उरी हल्ला केंद्रस्थानी होता, असे सूत्रांकडून समजते. बैठकीसाठी लष्करप्रमुख दलबिरसिंग, हवाई दलप्रमुख अरूप रहा आणि नौदल प्रमुख करमबिरसिंग उपस्थित होते; तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवलही बैठकीत सहभागी झाले होते. जम्मू काश्मीरमध्ये सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाल्याचा मुद्दाही चर्चिला गेल्याचे समजते. भारताला लक्ष्य करण्यासाठी पाकिस्तानकडून दहशतवादी गटांना मदत केली जात असल्याने त्या देशाला परिणामकारक प्रत्युत्तर देण्याच्या मुद्द्यावर मोदी यांनी भर दिल्याचे समजते. उरीच्या हल्लेखरांना सोडणार नाही, असे मोदी यांनी म्हटल्याचेही सूत्रांनी सांगितले. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीसाठी केरळकडे रवाना होण्यापूर्वी मोदी यांनी तिन्ही दलप्रमुखांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, भारतीय दलांनी सीमेवरून हल्ले केले, तर त्याला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानच्या लष्करानेही तयारी सुरू केली आहे, असे समजते.

Check Also

kejriwal

नोटा नाही, पंतप्रधान बदला : अरविंद केजरीवाल

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *