facebook
Thursday , December 8 2016
Home / देश / विदेश / मध्य प्रदेशच्या युवकाकडे नासाचे बनावट ओळखपत्र
nasa

मध्य प्रदेशच्या युवकाकडे नासाचे बनावट ओळखपत्र

अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाचे बनावट अोळखपत्र बाळगल्याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी एका युवकाला अटक केली आहे. अंसार खान असे या युवकाचे नाव आहे. 20 वर्षांचा अंसार केवळ हे बनावट ओळखपत्र बनवून नासाने आपल्याला वार्षिक पावणे दोन कोटी रुपयांचे पॅकेज दिल्याचे सांगत होता. या बनावट ओळखपत्रावर अमेरिकेचे अध्यक्ष बराक अोबामा यांची बनावट सहीदेखील आहे.

अंसार केवळ बारावीपर्यंत शिकला आहे. नासाने स्पेस अॅंड फू़ड कार्यक्रमात आपल्याला 1.85 कोटी रुपये वार्षिक वेतनावर नियुक्ती दिल्याचा कांगावा त्याने केला. या महिन्याच्या अखेरीसच आपण रुजू होणार असल्याचे तो सर्वांना सांगत होता. यानिमित्त त्याच्या शाळेने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात स्थानिक कमलापूरच्या शासकीय अधिकाऱ्यांनाही बोलावलं हाेतं.
बनावट ओळखपत्र गळ्यात अडकवल्याने अंसारला शासकीय कार्यालये, वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे विनासायास प्रवेश मिळत असे. 20 सप्टेंबरला तो एस. पी. शुक्ला यांना भेटायला गेला. अोळखपत्रावरची बराक ओबामा यांची स्वाक्षरी पाहून शुक्ला यांना संशय आला आणि त्यांनी आपल्या कार्यालयामार्फत अंसारचा दावा खरा आहे का त्याची तपासणी सुरू केली असता ते ओळखपत्र बनावट असल्याचे स्पष्ट झाले. या युवकाने अनेकांकडून पैसे उसने घेतले होते आणि नासाकडून पगार मिळताच परत करतो असे सांगत गंडा घातला होता.

पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, अंसार 14 आॅगस्टला कमलापूरच्या एका फोटो स्टुडिअोत गेला आणि ितथे नासामधले लोक आणि बराक अोबामा यांच्या सहीचे अोळखपत्र प्रिंट करून घेतले. अंसारला नासात नोकरी मिळाली आहे, हे खरं वाटल्याने त्याच्या शाळेने आणि अन्य स्थानिक संस्थांनीही त्याच्या सन्मानासाठी कार्यक्रम ठेवला होता. फोटो स्टुडिअो चालवणाऱ्या किशोर राठोड याच्याकडूनही अंसारने पैसे उसने घेतल्याची माहिती किशोरने पोलिसांना दिली. पोलीस अधिक्षकांसमोर उभं करताच घाबरलेल्या अंसारने बनावट ओळखपत्राची कबुली दिल्याचे या प्रकरणाचा तपास करणारे अधिकारी बी. एस. गोरे यांनी सांगितले.

Check Also

kejriwal

नोटा नाही, पंतप्रधान बदला : अरविंद केजरीवाल

आवाज न्यूज लाईन नवी दिल्ली : नोटाबंदीवरुन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *