facebook
Sunday , December 4 2016
Home / Featured / पंतप्रधानांची ‘शांती की बात’
modi

पंतप्रधानांची ‘शांती की बात’

शांतता, एकता आणि सलोख्यानेच आपण देशापुढील समस्येवर मात करू शकतो. काश्मीरच्या भावी पिढीसाठी आपण एकत्रितपणे समस्येचे निराकरण करूया, असे आवाहन उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी आज देशवासियांशी संवाद साधला. लवकरच ‘मन की बात’ला 2 वर्षे पूर्ण होत असल्याचीही त्यांनी आठवण करून दिली आणि हा कार्यक्रम यशस्वी करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. भारतीयांच्या शक्तीची जाणीव मला ‘मन की बात’मुळे होते असे ते म्हणाले. याचसोबत स्वच्छता अभियान, खादीवापराचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

मन की बातमध्ये पंतप्रधानांनी मांडलेले अन्य प्रमुख मुद्दे –
उरीमधल्या हल्ल्यानंतर देशवासियांच्या मनात खदखदत असलेल्या आक्रोशाचे खूप मोठे मूल्य आहे. हे राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतिक आहे. माझा लष्करावर पूर्ण विश्वास आहे. माझी खात्री आहे की आपले सैनिक अशा हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देतील.

पॅरालिम्पिकमधल्या भारतीयांच्या कामगिरिमुळे दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकाेन बदलला. शरीराची अवस्था, वाढते वय यावर मात देवेंद्र झाझरियाने सुवर्ण पदक जिंकून दाखवलेल्या कामगिरीचे कौतुक. अन्य पदकविजेत्यांचेही अभिनंदन.

स्वच्छता हा स्वभाव व्हायला हवा हे मी 2 वर्षांपूर्वी महात्मा गांधीजींच्या जयंतीदिनी म्हणालो होतो. स्वच्छतेसाठी प्रत्येक नागरिकाचे योगदान हवे. माध्यमांनीही स्वच्छता मोहिमेसाठी सकारात्मक भूमिका निभावली.

नागरिकांमध्ये स्वच्छतेविषयी जागरुकता वाढली. आपल्या शहरातले स्वच्छता मिशन जाणून घेण्यासाठी 1969 या क्रमांकावर संपर्क साधा. या क्रमांकावर शौचालय बनवण्याची मागणीही करू शकता.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *