facebook
Thursday , December 8 2016
Home / अहमदनगर / लातूर, बीड जिल्ह्यात प्रकल्प तुडूंब; १२८ मंडळात अतिवृष्टी
marathavada-heavy-rain

लातूर, बीड जिल्ह्यात प्रकल्प तुडूंब; १२८ मंडळात अतिवृष्टी

मराठवाड्यात मागील तीन-चार दिवसांपासून सर्वदूर पावसाने धुवांधार हजेरी लावली आहे. विभागातील १२८ मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून अनेक गावांत पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. या पावसामुळे सरासरी पावसाची टक्केवारी ओलांडली आहे. पाणी टंचाईमुळे सर्वाधिक दुष्काळाची दाहकता सोसणाऱ्या बीड, लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यांतील परिस्थिती बदलली आहे. मराठवाड्यातील तलाव, बंधारे, मध्यम व लघु प्रकल्प भरले आहेत. परभणीतील लोअर दुधनाचे अठरा तर, माजलगाव धरणाचे अकरा दरवाजे उघडण्यात आले आहेत. अतिवृष्टीमुळे अनेक गावातील शेती, घरांमध्ये पाणी साचल्याने शेतकरी, नागरिकांची चिंता वाढली आहे.

औरंगाबाद वगळता सातही जिल्ह्यांत दमदार पावसाने हजेरी लावत दुष्काळ धुवून काढला आहे. औरंगाबाद वगळता सर्वच जिल्ह्यांनी, २४ सप्टेंबरपर्यंत पावसाची वार्षिक सरासरीची टक्केवारी ओलांडली आहे. बीड, लातूर जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या ११३ टक्के तर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यात सरासरीच्या ९५ ते ९८ टक्के पाऊस झाला आहे. बीडमधील बार्शीरोडवरील पूल पाण्यामुळे शनिवारी काही वेळ वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
मांजरा-धनेगाव ३० टक्के
लातूरसह १२ गावांना पाणी पुरवणाऱ्या मांजरा-धनेगाव धरणात ३० टक्के जलसंचय झाला आहे. आता साठलेले पाणी दोन वर्षे पुरु शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे. पाण्याची आवक सुरुच असल्याने जलसाठा ५० टक्के साठा होईल अशी चिन्हे आहेत. मांजरा भरल्याने जनतेला दिलासा मिळाला आहे.

बिंदुसरा तुडुंब
बीडला पाणीपुरवठा करणारा बिंदुसरा प्रकल्प तुडुंब भरला असून माजलगाव तालुक्यातील उमरी आणि पारगावचा संपर्क तुटला आहे. जोडजवळ्याजवळ रस्त्यावर पाणी आल्याने लातूर-कळंब मार्ग बंद झाला आहे.

Check Also

news-1

वस्तूऐवजी पैसे देण्यास विरोध

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – राज्य सरकारने विविध कल्याणकारी योजनांमध्ये लाभार्थ्यांना प्रत्यक्ष वस्तू देण्याऐवजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *