facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / कोल्हापूर / भक्तांचे स्वागत होणार खड्ड्यांनी?

भक्तांचे स्वागत होणार खड्ड्यांनी?

नवरात्रोत्सवासाठी मंदिराची स्वच्छता तसेच तेथील सुविधांवर लक्ष दिले जात असले तरी या मंदिरापर्यंत येणाऱ्या रस्त्यांच्या अवस्थेकडे अद्याप लक्ष दिलेले नाही. पार्किंगच्या ठिकाणी जाणाऱ्या टेंब रोड, बिंदू चौक, शाहू मैदान, मिरजकर तिकटी, बाबूजमाल रोड परिसरातील रस्त्यांची अवस्था दयनीय आहे. राज्यभरातून येणाऱ्या भाविकांचे स्वागत महापालिका या ठिकाणच्या खड्ड्यांनी करणार का? असा सवाल आहे.

शहरात दोन महिन्यांपासून जोरदार पाऊस झाला आहे. त्यामुळे अनेक रस्ते उखडले आहेत. उपनगरांच्या परिसरातील रस्त्यांची अवस्था वाईट आहेच. पण शहराच्या मध्यवस्तीतीलही रस्त्यांची स्थिती चांगली नाही. येत्या शनिवारपासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. त्यासाठी राज्यभरातून दररोज लाखाहून अधिक भाविक दर्शनासाठी कोल्हापुरात येत असतात.

भाविकांची ही संख्या पाहून प्रशासनाला जय्यत तयारी करावी लागते. त्यानुसार मंदिर परिसरातील सुरक्षा तसेच आवारात भाविकांसाठी सुविधा देण्याचा, सुशोभीकरणाचे काम वेगावले आहे. पण ज्या

रस्त्यांवरुन भाविक मंदिरात येणार आहेत. त्या रस्त्यांकडे मात्र प्रशासनाचे लक्ष गेलेले नाही, असेच दिसते.

अंबाबाई मंदिराकडे जाण्यासाठी बिंदू चौक हा परिसर महत्वाचा आहे. या परिसरात पार्किंगची व्यवस्था असल्याने बहुतांश भाविक येथेच येतात. शाहू वैदिक स्कूलसमोरील रस्ता नव्हे, पाणंद झाली आहे. येथे वाहनांची वर्दळ मोठी असते. तरीही मुरूमासारखी तकलादू व्यवस्था महापालिकेने केली आहे. त्यानंतर आलेल्या पावसाने हा मुरुम धुवून गेला आहे. भाविक या परिसरातूनच मंदिराकडे मोठ्या संख्येने पायी जात असतात. त्यांना चालत जाण्यासारखीही परिस्थिती तिथे नाही. हीच अवस्था टेंबे रोडची झाली आहे. शिवाजी स्टेडियमवर पार्किंग असल्याने तिथून टेंबे रोडवरुन चालत मंदिराकडे जावे लागते. खड्ड्यांमुळे या रस्त्याची अवस्था वाईट असून येणाऱ्या भाविकांसाठी हेच कोल्हापूर? असा प्रश्न पडण्याची शक्यता आहे.

गांधी मैदान, पेटाळा या ठिकाणीही पार्किंगची व्यवस्था केली आहे. त्यासाठी न्यू महाद्वार रोडवरुन जावे लागते. हा रस्ता खराब झाला असून पावसाने उघडिप दिली की येथे धुळीचे साम्राज्य पसरते. त्याचा भाविकांना त्रासच होणार आहे. लक्ष्मीपुरीतील सुसर बागेतील शाळेकडे जाण्यासाठीही लक्ष्मीपुरीत असलेल्या मोठ्या खड्ड्यांमधून जावे लागणार आहे. मंदिर परिसराजवळील जोतिबा रोडवरही खड्डे भाविकांची पाठ सोडणार नाहीत. गाडगे महाराजांच्या पुतळ्यापासून महाद्वार रोडकडे जाणाऱ्या या रस्त्यावर खड्डे आहेतच. शिवाय पावसाने त्यामध्ये पाणी साठत असल्याने तिथून चालत जाता येत नाही. या रस्त्यांच्या अवस्थेमुळे भाविकांना मंदिरापर्यंत पोहचेपर्यंत त्रासच सहन करावा लागणार आहे. यासाठी महापालिकेने तातडीने या रस्त्यांवरील दुरुस्तीची कामे हाती घेण्याची आवश्यकता आहे.

Check Also

वाहतूकदारांचा शुल्कवाढीला विरोध

केंद्रीय मोटार वाहन नियमांतील विविध शुल्कात पाचपट वाढ केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कोल्हापूर डिस्ट्रीक्ट लॉरी ऑपरेटर्स …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *