facebook
Sunday , April 23 2017
Breaking News
Home / पुणे / विमानतळ चाकणलाच व्हायला हवा होता

विमानतळ चाकणलाच व्हायला हवा होता

विमानतळ पुरंदर ऐवजी चाकणला झाले असते, तर पिंपरी-चिंचवड आणि आसपासच्या परिसरातील उद्योगांना चालना मिळाली असती व या परिसराचा विकास झाला असता. परंतु, राज्य सरकारने विमानतळ पुरंरदला हलविण्याच्या निर्णयाबाबत पिंपरी-चिंचवड लघुद्योग संघटनेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पिंपरी-चिंचवड लघुद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे व सचिव जयंत कड यांनी लेखी निवेदन दिले आहे.

बेलसरे यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे, ‘तळेगाव, रांजणगाव, चाकण, पिंपरी, चिंचवड व औद्योगिक परिसरामध्ये एकूण बारा ते पंधरा हजार लहान-मोठ्या कंपन्या आहेत. कित्येक नवीन कंपन्या येत आहेत. यामध्ये अनेक नामंकित आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा समावेश आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळ औद्योगिक वसाहतीजवळ होणे आवश्यक होते. पण पुरंदरला होणाऱ्या विमानतळाचा या औद्योगिक वसाहतींना काही फायदा होणार नसल्यामुळे उद्योजकांमध्ये नाराजी पसरली आहे.’
चाकणमध्ये विमानतळ होणार अशी चर्चा गेल्या १५ वर्षांपासून सुरू होती. निमगाव, कनेरसर परिसरात खेड सेझच्या जागेत विमानतळ होणार असे जाहीर झाले. पण शेतकऱ्यांनी या सर्वच जागांना विरोध केल्यामुळे सरकारी अधिकाऱ्यांनी पुरंदर तालुक्यातील जागेची पाहणी केली. या ठिकाणी तळेगाव, रांजणगाव, चाकण, पिंपरी, चिंचवड या औद्योगिक परिसरामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय वाहन निर्मिती कंपन्या कार्यरत आहेत. यासाठी उद्योजक व परदेशी तंत्रज्ञ यांच्यासाठी चाकणला विमानतळ होणे गरजेचे होते, असेही संघटनेने म्हटले आहे.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *