facebook
Saturday , December 10 2016
Home / औरंगाबाद / अपहारप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा
crime

अपहारप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद : कुरिअर व्यवसायात भागीदार व चांगल्या पगाराचे अमिष दाखवून एका तरुणास अडीच लाखांचा गंडा घातल्या प्रकरणी नागपूरच्या एका दाम्पत्यासह चारजणांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विलास उत्तमराव सोनवणे (रा. मिसारवाडी) असे फिर्यादीचे नाव आहे. औरंगाबादेत कुरिअर सर्व्हिस सुरू होणार, अशी जाहिरात वाचून सोनवणे यांनी नागपूरच्या रेणुका कुरिअर सर्व्हिसेस कंपनीशी जानेवारी २०१६मध्ये संपर्क साधला. त्यावेळी औरंगाबादेतील सिडको परिसरात कुरिअरचे कार्यालय सुरू करण्यात येणार असून, त्यामध्ये व्यवस्थापकाची नोकरी देण्याचे अमिष कंपनी अधिकाऱ्यांनी त्यांना दाखवले. त्यासाठी आरोपी राजेश नायकेले व त्याची पत्नी रेणुका नायकेले (रा. सेवासदन बिल्डिंग, सेंट्रल पार्क, गांधीबाग, नागपूर) यांनी सुरुवातीला दोनशे रुपये व त्यानंतर सुरक्षा ठेव म्हणून सोनवणे यांच्याकडून एक लाख रुपये घेतले. वीस हजार रुपये मासिक वेतन देण्याचे अमिष त्यांनी दाखविण्यात आले होते. मात्र, त्यानंतर कुरिअर कार्यालय सुरू झाले नाही. वारंवार मागणी करूनही पैसे परत न मिळाल्याने सोनवणे यांनी पोलिसांकडे धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून राजेश व त्याची पत्नी रेणुका नायकेले, कैलास सोनकुसनेसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Check Also

aawaz-news-image

शिरसाट, दानवेंचा खासदारांना ‘दे धक्का’

आवाज न्यूज नेटवर्क – औरंगाबाद – चार महिन्यांपूर्वी एकमेकांवर आरोप करणारे आमदार संजय शिरसाट व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *