facebook
Thursday , December 8 2016
Home / जळगाव / धर्मग्रंथ कळल्यास आतंकवाद संपेल!
terror

धर्मग्रंथ कळल्यास आतंकवाद संपेल!

देशात विषमतावाद, आतंकवाद खूप वाढला आहे. हे सारे मिटवायचे असेल, तर पाचवी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व धर्मग्रंथ कळू द्यायला हवेत. जेणेकरून जो खोटा आहे त्याचा विनाश झाला पाहिजे हे विद्यार्थ्यांना समजू शकेल, असे प्रतिपादन प्रसिद्ध कवी जगदीश देवपूरकर (धुळे) यांनी केले.

साहित्यिक कै. प्रा. नारायण शिरसाळे यांच्या स्मृती निमित्ताने कविवर्य नारायण शिरसाळे दुसरे प्रेरणा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून देवपूरकर बोलत होते. संमेलनाचे उद्‌घाटन साहित्यिक रा. शे. साळुंखे यांच्या हस्ते झाले. कवी डी. बी. जगत्पुरिया, वीणा शिरसाळे उपस्थित होते. देवपूरकर म्हणाले की, पैशाने माणसे उभे राहू शकतात. पण पुस्तकातून मने उभी राहतात. रंग- साहित्य देशाला पुढे नेत असतात. मतपेटीतून संमेलनाध्यक्षांची निवड करणे हे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. रा. शे. साळुंखे म्हणाले की, साहित्य क्षेत्रात रा. सो. सुतार, नारायण शिरसाळे आणि मी अशा तिघांनी मिळून जळगावात प्रथमच साहित्य कट्टा सुरू केला होता. शिरसाळे गेल्यानंतर त्यांनी सुरू केलेली ही साहित्य चळवळ बंद झाली आहे. ती पुन्हा नव्याने सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राजकारणात गेल्यावर साहित्यापासून पूर्णपणे वेगळा झालो. परंतु शिरसाळेंनी मला राजकारणात असताना लिखाण का करत नाही?, असे सुचविले आणि यातूनच पुन्हा साहित्यात आलो आणि ‘तत्वा’ ही कादंबरी लिहू शकल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

आदिवासी तडवी समाजाचा मोर्चा

तालुक्यातील रसलपूर येथील रहिवासी मुबारक तडवी हा जळगाव येथील आदिवासी विद्यार्थी वसतिगृहात शिकत होता. तो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *