facebook
Saturday , December 10 2016
Home / पुणे / ‘समाज बोलत नाही; सरकारनेच समजून घ्यावे’
43

‘समाज बोलत नाही; सरकारनेच समजून घ्यावे’

‘मराठा समाज बोलत नाही तोपर्यंत सरकारने आता समजून घ्यायला हवे. मराठा बांधवानो आता एक व्हा, जागे व्हा आणि जागृत व्हा,’ अशा शब्दांत मोर्चातील उपस्थित लाखोंच्या समुदायाला रणरागिणींनी आवाहन केले. आता मुंबईतच नव्हे तर दिल्लीतही मराठ्यांचा आक्रोश पोहोचविला जाईल, असा इशाराही या वेळी देण्यात आला. शेतकऱ्यांवर होणाऱ्या अन्यायापासून प्रवेशापासून नोकरीत नाकारली जाणारी संधी अशा मुद्द्यांवर समाजाच्या भावनांना या मुलींनी वाट करून दिली.

दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास मोर्चा विधानभवन चौकात पोहोचला. व्यासपीठावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास प्रतीक्षा गव्हाणेने पुष्पहार अर्पण केला. शुभदा येवलेने निवेदनाचे वाचन केले. या वेळी मोहिनी पलांडे, अर्चना भोर, सुचित्रा भालेराव या तरुणींनी परखड शब्दांत आपले मनोगत व्यक्त केली.

‘मराठ्यांना प्रत्येक क्षेत्रात मागे खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. समाजव्यवस्था बदलत नाही, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत समाजाला न्याय मिळणार नाही. शिवाजी महाराज यांच्या स्मारकासाठी सरकारने आपली भूमिका स्पष्ट करायला हवी. सरकार स्मारक बांधणार नसेल, तर राज्यातील मराठा एकत्र येऊन ९०० कोटी रुपयांचा निधी गोळा करून स्मारक तयार करू. दुसऱ्यांच्या ताटातील आम्हाला भाकरी नको. तर आमच्या हक्काची, वाट्याची भाकरी हवी आहे,’ अशी भावना मोहिनीने व्यक्त केली, तेव्हा लाखोंच्या जनसमुदायात गंभीर शांतता निर्माण झाली.

मनोगतात मोहिनीने शेतकऱ्यांच्या शेतमालाला मिळणाऱ्या दरापासून ते त्यांच्या आत्महत्येपर्यंत आणि मराठ्यांच्या विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात मिळणाऱ्या प्रवेशापासून ते नोकरीपासून वंचित या मुद्द्यांवरून उपस्थितांचे लक्ष वेधले. शेतकऱ्यांसाठी सरकार काय योजना करीत आहे असा सवाल करीत ती म्हणाली, ‘सरकार एक रुपया देते आणि शेतकऱ्यांपर्यंत १४ पैसेदेखील पोहोचत नाही. दुष्काळी परिस्थितीमुळे आर्थिक स्थिती खालावलेली आहे. त्यामुळे मुलामुलींचे शिक्षण, मुलींची लग्ने कशी करायची असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे असल्याने त्यांना आत्महत्या करावी लागत आहे. राज्यात ९० टक्के शेतकरी हा मराठी बांधव आत्महत्या करणारा आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय केले?’

‘ज्यांना जमीन नाही त्यांना अनुदान दिले जाते आणि जमीन असलेल्यांना अनुदान अद्याप मिळत नाही. प्रवेशापासून आरक्षण सुरुवात होते. सरकार स्मार्ट सिटी करायला निघाले आहे आणि ग्रामीण भागाचा निधी शहराकडे वळविला जात आहे,’ असा आरोपही तिने केला.

Check Also

news-9

‘देर से आए, लेकिन दुरुस्त आए’

आवाज न्यूज नेटवर्क – पुणे – पुणे मेट्रो प्रकल्पाला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *