facebook
Sunday , December 11 2016
Home / अहमदनगर / सौताडा घाटरस्ता खड्ड्यात
23282366233523522360238123402366-2348234423542366-23502371234023812351236923302366-23602366234623552366

सौताडा घाटरस्ता खड्ड्यात

सौताडा घाटात मागील काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे घाटातील रस्त्यांची आतिशय दुरवस्था झाली आहे. साइडपट्ट्याच वाहून गेल्याने अनेक ठिकाणी मोठमोठे एक ते दोन फुटांचे खड्डे पडले आहेत. या मुळे सैताडा घाट मुत्युचा सापळा बनला आहे.

मराठवाड्यातील सीमारेषेवर असलेल्या जामखेडपासून सहा सात किलोमीटर अंतरावरील नगर-बीड रस्त्यावरील सौताडा घाटातून रोज शेकडो वाहने ये-जा करतात. त्यातच सध्या पावसाळा सुरू असल्याने पावसाने नगर-बीड रस्त्यांची चाळणी झाली आहे. पाणी साचलेल्या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने अपघातही होत आहेत. आधीच पडलेले खड्डे आणि त्यात साचलेले पाणी चुकविताना वाहनधारकांना खड्ड्यातून रस्ते शोधण्याची वेळ आली आहे. यामुळे वाहनधारक त्रस्त तर बांधकाम विभाग सुस्त, असा सूर व्यक्त केला जात आहे. शहरापासून सहा-सात किमीवर असलेल्या सौताडा घाटातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. घाटातील रस्त्यांच्या दोन्ही भागाकडील साइडपट्ट्या वाहून गेल्या आहेत. या ठिकाणी अंदाजे एक ते दोन फुट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे घटातून समोरून येणाऱ्या वाहनांना साइड देताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. साइडपट्ट्या वाहून गेल्याच तसेच घाटातून उतरताना डाव्या बाजूला तर रस्त्याच्या कडेचा भाग वाहून गेला असल्याने येणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. घाटातून समोरून येणाऱ्या वाहनांना साइड देताना मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हीच परीस्थिती शहरातून जाणाऱ्या नगर-जामखेड, करमाळा-कर्जत, शहराकडे जाणाऱ्या रस्त्याची आहे. या रस्त्यांची अक्षरश: चाळणीच झाली आहे. या सर्व महामार्गवारील रस्त्यांवर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते अशी परिस्थिती झाली आहे. शहरातून जाणाऱ्या विविध ठिकाणी असलेल्या खराख रस्त्यांची दुरुस्ती नेमकी केव्हा होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. रस्त्याविषयी सत्ताधारी पक्षाचे तसेच विरोधी पक्षाचे नेते एक साधे निवेदन, आंदोलन करायलाही पुढे येत नाहीत. याबाबत नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागही या कडे लक्ष देत नाही. या मुळे वाहनचालकांना खड्डेमय रस्त्यातून सतत जा-ये करावी लागते. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे या ठिकाणी नेहमीच अपघात घडत आहेत. याकडे कोणाचेच लक्ष नाही. या रस्त्याकडे कुणी लक्ष देईल काय? असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

कोट –

सैताडा घाटात या पूर्वीही खराब रस्त्यांमुळे मोठे अपघात झाले आहेत. त्या वेळी आम्ही स्वतः अपघातग्रस्तांना मदत केली आहे. सध्या पडणाऱ्या जोरदार पावसामुळे शहरातील रस्त्यांबरोबरच सैताडा घाटातील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत तर काही भाग वाहून गेला असल्याने या घाटात मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. या मुळे प्रशासनाने तातडीने दखल घेऊन रस्ता दुरूस्ती करून रुंदीकरण करावे.

– विठ्ठल अण्णा राऊत, सामाजिक कार्यकर्ते, जामखेड

Check Also

agreement

जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार थंडावले

पाचशे व हजार रुपयांच्या नोटा व्यवहारातून रद्द केल्यानंतर चलन तुटवड्यामुळे जिल्ह्यातील जमीन, फ्लॅट खरेदी-विक्रीचे व्यवहार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *