facebook
Saturday , December 3 2016
Home / कोल्हापूर / हवालाची रक्कम गुजरातमधील कंपनीची
money

हवालाची रक्कम गुजरातमधील कंपनीची

मध्यवर्ती बसस्थानक परिसरात शनिवारी (ता. २४) रात्री जप्त केलेली ‘हवाला’मार्गे पाठवली जाणारे एक कोटी ६८ लाख रुपये गुजरात येथील एका कंपनीची असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी रविवारी कंपनीच्या मॅनेजरकडे कसून चौकशी केली आहे. एवढी मोठी रक्कम कशासाठी आणली होती याचा शोध घेतला जात आहे. हवाला कंपनीचे मालक धीरजभाई पटेल यांच्याकडेही सोमवारी चौकशी करण्यात येणार आहे.

शनिवारी रात्री ११ वाजता मध्यवर्ती बसस्थानक परिरसरातून व्ही. आर. एल. कंपनीच्या ट्रॅव्हल्समधून बेंगलोरकडे जाणाऱ्या भरत जयंतीलाल पटेल (वय ४६), प्रकाश चर्तुगिरी गोस्वामी (वय ३६), महेश विक्रमसिंह रजपूत- चव्हाण (वय २३), रमणसिंह शंकरसिंह चव्हाण उर्फ रजपूत (वय २५ सर्व रा. सध्या शाहूपुरी, मूळ रा. गुजरात) यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडले होते. त्यांच्याकडून १ कोटी ६८ लाख रुपये जप्त करण्यात आले होते. शनिवारी रात्री ८ वाजता या चौघांना ही रक्कम कंपनीच्या शाहूपुरी कार्यालयात देण्यात आली होती. ही रक्कम गुजरात येथील शैलेंद्र पटेल अँड कंपनीची असल्याचे तपासात समोर आले होते. या कंपनीचे मालक धीरज पटेल यांना पोलिसांनी अहमदाबाद येथून कोल्हापुरात बोलवले आहे. दरम्यान, या कंपनीचे कोल्हापुरातील कामकाज अश्विन पटेल, अजित पटेल, निकेश पटेल हे पाहत होते. यापैकी नीकेश पटेल याच्याकडे पोलिसांनी रविवारी दिवसभर चौकशी केली. अटक केलेल्या चौघांचे फोन पोलिसांनी जप्त केले होते. या फोनचे कॉल डिटेल्स तपासण्याचे काम सुरू आहे.

Check Also

news-15

आठ डिसेंबरला महापौर निवड

आवाज न्यूज नेटवर्क – कोल्हापूर – महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आठ डिसेंबर रोजी निवडणूक होत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *