facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / ​टॅक्सीचं भाडं टाळण्यासाठी बनले दहशतवादी
fake-terrorists

​टॅक्सीचं भाडं टाळण्यासाठी बनले दहशतवादी

दारूच्या नशेत असलेल्या पाच तरुणांना स्वत:ला दहशतवादी म्हणवण्याची चतुराई चांगलीच महागात पडली. टॅक्सीचं भाडं टाळण्यासाठी आपण दहशतवादी असल्याची बतावणी करत या तरुणांनी टॅक्सी चालकाला घाबरवण्याचा प्रयत्न केला. ही घटना काल रात्री भांडुपमध्ये घडली.

पोलिसांनी या पाच तरुणांना लोकांमध्ये घबराट पसरवण्याच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री १२.४० वाजण्याच्या सुमाराला पाच तरुणांनी ठाण्याच्या सव्हील हॉस्पिटलला जाण्यासाठी संदीप सकपाळ यांची टॅक्सी बुक केली. हे तरुण नशेत असल्याचं पाहून संदीप सकपाळ यांनी त्यांचं भाडं नाकारलं. आपल्याला हॉस्पिटलला जाणं खूपच गरजेचं असल्याचं या युवकांनी टॅक्सी चालकाला सांगितलं. आपण मुलुंडहून दुसरी टॅक्सी बूक करु असं म्हटल्यानंतर टॅक्सी चालक तयार झाला.

टॅक्सीत बसल्यानंतर काही वेळानं हे युवक आपसात मोठमोठ्याने बोलू लागले. बोलत असताना ते कुठे बॉम्बस्फोट घडवून आणायचा याबाबत चर्चा करू लागले.

याबाबत माहिती देताना टॅक्सी चालक म्हणाला, ‘ आपण उरणची रेकी केली असून मुंबई आणि ठाण्यात बॉम्बस्फोट घडवण्याठी जागा शोधूया असं म्हणत ते स्फोटासाठी जागा निश्चित करण्याबाबत आपसात बोलत होते. आपण हॉस्पिटलमध्ये बॉम्बस्फोट करायचा नाही अशीही चर्चा त्यांनी केली.’

यानंतर टॅक्सी चालकांने ताबडतोब पोलिसांना याबाबत माहिती दिली.

दहशतवादी असल्याची बतावणी करणाऱ्या या तरुणांची नावं जीतू झा (३०), प्रदीप पीसल (३९), सैयद शैकाल्कल (३५), नागेंद्र यादव (२५), आणि अखिलेश ओझा (२९) अशी असल्याची माहिती ठाण्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी दिली. या पाच तरुणांविरूद्ध भारतीय दंडविधान कलम ५०५(१)(ब) अंतर्गत लोकांमध्ये घबराट पसरवण्याबाबत गुन्हा दाखल केला आहे.

Check Also

news-24

हिंसामय गुन्ह्यांत नगर राज्यात टॉपला

आवाज न्यूज नेटवर्क – अहमदनगर – खून, दरोडे, बलात्कार अशा हिंसामय गुन्ह्यांत कायम अशांत असणारा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *