facebook
Monday , December 5 2016
Home / Featured / काश्मिरी तरुणांनी बंदुका उचलू नयेत; मुझफ्फर वानी
muzaffar-wani

काश्मिरी तरुणांनी बंदुका उचलू नयेत; मुझफ्फर वानी

काश्मीरमधील चकमकीत ठार झालेला हिज्बुल मुजाहिदीनचा कमांडर बुरहान वानीचे वडील मुझफ्फर वानी यांचा सूर काहीसा मवाळ झाला आहे. काही महिन्यांपूर्वी कट्टरपंथीयांना पाठिंबा जाहीर करून काश्मीरसाठी लढा देण्याचं जाहीर करणाऱ्या आणि मुलीलाही या लढ्यात उतरवण्याची भाषा करणाऱ्या मुझफ्फर यांनी, चर्चेनेच काश्मीर मुद्दा सुटू शकतो, त्यासाठी काश्मिरी तरुणांनी बंदुका उचलू नयेत, अशी सामंजस्याची भूमिका घेतली आहे.

‘माझा तिसरा मुलगा बंदूक उचलणार नाही, माझ्या मुलीनं शिक्षक व्हावं अशी माझी इच्छा आहे आणि मी कुठल्याही राजकीय पक्षात प्रवेश करणार नाही’, असं मुझफ्फर वानी यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केलंय. इतकंच नव्हे तर, चकमकीआधी दोन महिने बुरहानला समजावण्याचा, त्याचं मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला होता, असंही त्यांनी नमूद केलंय. अर्थात, काश्मीरवर अन्याय होत असल्याच्या मुद्द्यावर ते ठाम आहेत आणि काश्मीरचा मुद्दा निकाली निघेपर्यंत हल्ले होऊच शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधलंय. उरी हल्ल्यातील पाकिस्तानच्या सहभागाबद्दल मात्र त्यांचं वेगळं मत आहे.

 

Check Also

news-4

बारा हजार सेटटॉप बॉक्स

आवाज न्यूज नेटवर्क –  अहमदनगर – शहरी भागातात फेज थ्री मध्ये सेटटॉप बॉक्स बसविण्याची कार्यवाही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *