facebook
Thursday , April 27 2017
Breaking News
Home / Featured / हनिफ कडावालाची हत्या छोटा राजननेच घडवली?

हनिफ कडावालाची हत्या छोटा राजननेच घडवली?

 अभिनेता संजय दत्तला एके ५६ पुरवणारा १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणातील आरोपी हनिफ कडावालाची हत्या केल्याचा दुसरा गुन्हा सीबीआयने तिहार तुरुंगात असलेल्या छोटा राजनवर दाखल केला आहे. या पुर्वी राजनवर ज्येष्ठ पत्रकार जे. डे. यांच्या हत्येचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
राज्य सरकारकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने हा तपास हाती घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. छोटा राजनसह त्याचा त्यावेळचा हस्तक गुरू साटम आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोटा राजनच्या इशाऱ्यावरूनच गुरू साटमने तीन मारेकऱ्यांना हनिफ कडावालाच्या वांद्रे येथील कार्यालयात घुसवून ७ फेब्रुवारी २००१ला हत्या केली होती.

याप्रकरणी सीबीआयच्या हाती काही महत्त्वाचे पुरावे लागल्याने, नव्याने गुन्हा दाखल करत तपास सुरू करण्यात आला आहे.

हनिफ हा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा खास सहकारी होता. दाऊद आणि टायगर मेमनच्या सांगण्यावरून हनिफने दुबई व्हाया कराचीमार्गे रायगड जिह्यातील शेखाडी बंदरात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके पाठवली होती. १९९३च्या साखळी बॉम्बस्फोटांमध्ये या शस्त्रात्रे आणि स्फोटकांचा वापर करण्यात आला होता. या बरोबर हनिफने स्फोट घडवण्यासाठी काही तरुणांना तयारही केले होते.

दाऊदचा भाऊ अनिस आणि बॉलिवुड अभिनेता संजय दत्त यांचे जवळचे संबंध होते. या दोघांचे बोलणे सातत्याने होत असतानाच, अनिसने संजय दत्तला एके-५६ देत असल्याचे सांगितले होते.

संजय दत्तने ही एके-५६ रायफल आपल्या गॅरेजमध्ये लपवून ठेवली होती. पुढे १९९३ला साखळी बॉम्बस्फोट झाल्यानंतर संजय दत्तने या रायफलच तुकडे करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी संजय दत्तला पाच वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

संजय दत्त दोषी आढळल्यानंतर पुढे १६ एप्रिल १९९३ला कडावालाला टाडा कायद्यातंर्गत अटक करण्यात आली.

पुढे २००१ मध्ये आपली ओळख युसूफ अशी देत एका व्यक्तीने बिझनेस डीलचे कारण देत कडावालाच्या भेटीची वेळ मिळवली. त्यानंतर तीन व्यक्तींनी ७ फेब्रुवारीला त्याच्या वांद्रे येथील कार्यालयात घुसून .३२ च्या रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडून हत्या केली. फरार झालेल्या या तिघांना पकडल्यांनतर त्यांनी गुरु साटम आणि छोटा राजनच्या सांगण्यावरून ही हत्या केल्याची कबुली दिली.

याबरोबरच, ४ मे २००१ला झालेल्या हॉटेल व्यवसायी जया शेट्टीच्या हत्येचा देखील सीबीआयने तपास हाती घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
स्फोटात सहभागी झालेल्या दाऊदच्या हस्तकांचा छोटा राजन आणि त्याचे खास हस्तक डी. के. राव, गुरु साटम, हेमंत पुजारी यांनी खात्मा करण्यास सुरुवात केली होती.

Check Also

1)देहूरोडमध्ये बॉम्ब सदृष्य वस्तूचा स्फोट; तीन जखमी 2) स्वाईन फ्लूमुळे पुणे व्हेंटीलेटरवर

Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *