facebook
Monday , December 5 2016
Home / मुंबई / दिवाळीपर्यंत सोने ३२ हजारांपर्यंत महागणार?
download

दिवाळीपर्यंत सोने ३२ हजारांपर्यंत महागणार?

अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्ह बँकेच्या व्याजदरांच्या व्यक्त होणाऱ्या अंदाजांच्या पार्श्वभूमीवर वस्तू वायदे बाजारात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे. त्यातच यंदा सोन्याचे भाव पंचवीस टक्क्यांनी वधारले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारासह देशांतर्गत बाजारातही सोन्याचे भाव चढे असल्याचे दिसून आले आहे.

आर्थिक विश्लेषकांच्या मते ‘फेडरल रिझर्व्ह’ची आगामी बैठक डिसेंबरमध्ये असून, या पार्श्वभूमीवर दिवाळीपर्यंत सोने १० ग्रॅमसाठी ३२ हजार रुपयांचा आकडा पार करण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये सोने महागणार असले तरी, डिसेंबरमध्ये सोन्याचे भाव पुन्हा घसरण्याची शक्यता असल्याचा दावा विश्लेषकांनी केला आहे. आतापर्यंत अमेरिकन फेडरल रिझर्व्हने व्याजदरांमध्ये वाढ केलेली नाही. त्यामुळे सर्वांची नजर डिसेंबरमध्ये होणाऱ्या फेडरलच्या बैठकीकडे लागली आहे.

गोल्ड ईटीएफमध्ये वाढती गुंतवणूक

एकीकडे सोन्याचे भाव वाढत असतानाच दुसरीकडे जगभरात गोल्ड ईटीएफमधील गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून आले आहे. रुपयाच्या घसरणीलाही देशांतर्गत बाजारात सोन्याच्या दरवाढीमुळे चांगला हात मिळत आहे. अशा परिस्थितीत कमी कालावधीसाठी का होईना, सोन्यामध्ये गुंतवणूक करण्याची गरज असल्याचे गुंतवणूकदारांना वाटते. सोन्यातील गुंतवणुकीवर आतापर्यंत २५ टक्के परतावा मिळाला असून, भविष्यातही सोन्यातील भावात तेजी राहण्याची शक्यता आहे.

दिवाळीनंतर मोठी खरेदी

दर वर्षी दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या खरेदीचे प्रमाण वाढते. सोन्याचे वाढते भाव पाहता दिवाळीपर्यंत गरजेपुरतीच सोन्याची खरेदी करण्याची आवश्यकता आहे. मोठ्या प्रमाणात खरेदी करायची असेल, तर ती डिसेंबरमध्ये करावी असा सल्ला विश्लेषक देतात. सोन्याच्या भावात दिवाळीपूर्वी करेक्शन होऊ शकते किंवा मोठ्या प्रमाणात विक्री केली जाऊ शकते, असेही विश्लेषक म्हणतात. अशावेळी खरेदी केली जाऊ शकते. सोन्याची खरेदी करणाऱ्यांनी बाजाराचा अभ्यास करूनच निर्णय घ्यावा.

गोल्ड बाँडची तारीख लांबली

पाचव्या टप्प्यातील गोल्ड बाँड जारी करण्याची मुदत केंद्र सरकारने एका आठवड्याने पुढे ढकलली आहे. पूर्वी हे बाँड २३ सप्टेंबर रोजी जारी होणार होते; ते आता ३० सप्टेंबरला जाहीर होतील. रिझर्व्ह बँकेशी चर्चा केल्यानंतरच केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

Check Also

news-1

दहावीनंतरच्या करिअरबाबत मार्गदर्शन

आवाज न्यूज नेटवर्क – मुंबई – दहावीची परीक्षा सर्वच विद्यार्थ्यांच्या करिअरमधली अत्यंत महत्त्वाची परीक्षा मानली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *