facebook
Tuesday , April 25 2017
Breaking News
Home / देश / विदेश / दलित गर्भवतीला गुजरातमध्ये मारहाण

दलित गर्भवतीला गुजरातमध्ये मारहाण

मृत गायीची विल्हेवाट लावण्यास नकार दिल्याने गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील कारजा गावात दलित गर्भवती महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

निलेश रानवासिया यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. दरबार समाजाच्या दहा जणांनी आपल्या कुटुंबावर हल्ला केला असून गर्भवती पत्नी संगीता हिलाही मारहाण केली, असे रानवासिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. मृत गाय नेण्यास नकार दिल्याने शनिवारी रात्री ही मारहाण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेत संगीता, तसेच इतर दोन महिलांसह सहा जण जखमी झाले आहेत. संगीता यांच्यावर पालनपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलेश आणि इतर किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भटवरसिंह चौहान (२६), मकनुसिंह चौहान (२१), योगिसिंह चौहान (२५), भवरसिंह चौहान (४५), दिलवरसिंह चौहान (२३) आणि नरेंद्रसिंह चौहान (२३) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गावात धाव घेऊन काही तासांतच सहा जणांना अटक केली, असे बनासकांठाचे पोलिस अधीक्षक नीरज बडगुजर यांनी सांगितले. गावात पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली.मृत गायीची विल्हेवाट लावण्यास नकार दिल्याने गुजरातच्या बनासकांठा जिल्ह्यातील कारजा गावात दलित गर्भवती महिलेसह तिच्या कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार घडला. भारतीय दंड संहिता आणि अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

निलेश रानवासिया यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. दरबार समाजाच्या दहा जणांनी आपल्या कुटुंबावर हल्ला केला असून गर्भवती पत्नी संगीता हिलाही मारहाण केली, असे रानवासिया यांनी तक्रारीत म्हटले आहे. मृत गाय नेण्यास नकार दिल्याने शनिवारी रात्री ही मारहाण झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या घटनेत संगीता, तसेच इतर दोन महिलांसह सहा जण जखमी झाले आहेत. संगीता यांच्यावर पालनपूर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. निलेश आणि इतर किरकोळ जखमींना प्राथमिक उपचारांनंतर घरी सोडण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी भटवरसिंह चौहान (२६), मकनुसिंह चौहान (२१), योगिसिंह चौहान (२५), भवरसिंह चौहान (४५), दिलवरसिंह चौहान (२३) आणि नरेंद्रसिंह चौहान (२३) यांना पोलिसांनी अटक केली आहे.

घटनेनंतर पोलिसांनी तातडीने गावात धाव घेऊन काही तासांतच सहा जणांना अटक केली, असे बनासकांठाचे पोलिस अधीक्षक नीरज बडगुजर यांनी सांगितले. गावात पोलिसांनी बंदोबस्त ठेवल्याची माहितीही त्यांनी दिली.

Check Also

क्युबाचे माजी अध्यक्ष फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन

आवाज न्यूज नेटवर्क – क्युबाचे माजी अध्यक्ष व कम्युनिस्ट क्रांतीचे नेते फिडेल कॅस्ट्रो यांचं आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *