facebook
Thursday , December 8 2016
Home / Featured / आंध्र, तेलंगणात एनडीआरफ तैनात
06

आंध्र, तेलंगणात एनडीआरफ तैनात

आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘एनडीआरएफ’च्या (राष्ट्रीय आपत्ती निवारण दल) १७ टीम तैनात करण्यात आल्या आहेत. यामध्ये सुमारे ५५० जवानांचा समावेश आहे.

केंद्र सरकारतर्फे पूरग्रस्त भागात ६० बोटी आणि वैद्यकीय साहित्य तसेच डॉक्टरांची टीमही पाठविण्यात आली आहे. या भागात गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. आंध्र प्रदेशात एनडीआरएफच्या नऊ टीम जण तैनात केल्या असून, त्यांना ३२ हवेच्या बोटी पुरविण्यात आल्या आहेत. तसेच, त्वरित संपर्कासाठीची साहित्येही पुरविण्यात आली आहेत. गुटुंर जिल्ह्यातील पेडूगुरालू, नारसारापेठ आणि अमरावती भागात एनडीआएफचे लष्कर तैनात केले आहे. तेलंगणासाठी एनडीआरएफच्या पाच टीम तैनात केल्या असून त्यांना १६ बोटी पुरविण्यात आल्या आहेत.

 मेडक, निझामाबाद तसेच कर्नाटकातील बिदर, कलबुर्गी, बेंगुळुरू जिल्ह्यातही एनडीआरएफ दल तैनात करण्यात आले आहे.एनडीआरएफ दल परिस्थितीवर नियंत्रण ठेवत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नागरिकांना पुराचा इशारा

कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशातील गोदावरी, कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे जलसंपदा खात्याने दिला आहे. या भागांत पुढील तीन दिवस पूरस्थितीचा इशारा देण्यात आला आहे. तेलंगणातील निझामाबाद, अदिलाबाद, करीमनगरया तसेच आंध्र प्रदेशातील पूर्व आणि पश्चिम जिल्ह्यात सावधानेचा इशारा देण्यात आला आहे. कृष्णा नदीकाठी असलेल्या कलबुर्गी, यादगीर, विजयपुरा, बागलकोट, रायचूर याबरोबरच आंध्र प्रदेशातील कर्नुल जिल्ह्यालाही सावधानतेचा इशारा दिला आहे.

Check Also

aawaz-news-image

‘पोलिसांची भीती मनातून काढून टाका’

आवाज न्यूज नेटवर्क – जळगाव – कायदा वा नियम हे समाजाच्या भल्यासाठीच असून, त्यांचे जो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *