facebook
Thursday , December 8 2016
Home / कोल्हापूर / कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद
water

कोल्हापुरात आज पाणीपुरवठा बंद

शिंगणापूर उपसा केंद्रातील इलेक्ट्र‌िकल व गळती दुरुस्तीचे काम करण्यात येणार असल्याने सोमवारी (ता. २६) शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मंगळवारीही पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार आहे.

सोमवारी वीज पुरवठा बंद ठेवण्यात येत असल्याने त्या कालावधीत महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने इलेक्ट्र‌िकलचे काम हाती घेण्यात येणार आहे. शिंगणापूर उपसा केंद्राच्या सबस्टेशनमधील इलेक्ट्रिकल पंप दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. त्याचवेळी शिंगणापूर जॅकवेलजवळील एक हजार मिलीमीटर व्यासाच्या पाइपलाइनवरील गळतीच्या दुरुस्तीचे कामही करण्यात येणार आहे.

 त्यामुळे ए, बी, सी, डी व ई अशा पाचही वॉर्डमध्ये म्हणजेच पुर्ण शहराला सोमवारी या दुरुस्तीचा फटका बसणार आहे. दुरुस्तीची पुर्वतयारी करण्यात आली असल्याने सोमवारी रात्रीपर्यंत काम पुर्ण होईल. त्यानंतर पाणी उपसा सुरू करण्यात येऊन मंगळवारपासून सर्व भागात पाणी पुरवठा होईल, याची काळजी घेण्यात येणार आहे. मात्र मंगळवारी सर्व ठिकाणी पाण्याची मागणी वाढणार असल्याने अनेक भागात अपुरा पाणी मिळण्याची शक्यता आहे.

Check Also

img

विविध संघटनांतर्फे बाबासाहेबांना अभिवादन

विविध राजकीय पक्ष, संघटनांसह शाळा-महाविद्यालयांत विविध कार्यक्रम, उपक्रमांतून भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *