facebook
Wednesday , April 26 2017
Breaking News
Home / मुंबई / गायिकेला सिंगापूरहून बोलावलं; मुंबईत केला बलात्कार

गायिकेला सिंगापूरहून बोलावलं; मुंबईत केला बलात्कार

 ‘स्टेज शो’मध्ये काम देण्याचं प्रलोभन देत सिंगापूरहून मुंबईत बोलावलेल्या गायिकेवर चारकोप येथील प्रदीप नावाच्या व्यक्तीनं बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडितेनं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी प्रदीपला त्याच्या घरातून अटक केली आहे. बोरिवली न्यायालयात हजर केले असता, त्याला २७ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्यावर्षी फेसबुकवरून पीडित गायिकेची आरोपी प्रदीपसोबत मैत्री झाली. फेसबुकवर चॅटिंग करताना त्यानं प्रसिद्ध गायकांसोबत स्टेज शो आयोजित करतो, असं तिला सांगितलं. ‘स्टेज शो’मध्ये काम देतो, असं प्रलोभनही दिलं. त्यानं फेकलेल्या जाळ्यात पीडिता अडकली. ३ सप्टेंबरला ती मुंबई आली आणि प्रदीपची भेट घेतली. २२ सप्टेंबरला प्रदीपनं आपल्या घरात पीडितेवर बलात्कार केला. घडलेल्या प्रकाराबाबत तिनं खारदांडा येथे राहणाऱ्या आपल्या मोठ्या बहिणीला सांगितलं. दोघींनीही वांद्रे पोलीस ठाणं गाठलं. तेथील पोलिसांनी गुन्हा नोंदवून हे प्रकरण चारकोप पोलिसांकडे सोपवलं. चारकोप पोलिसांनी प्रदीपला त्याच्या घरातून अटक केली.

Check Also

१० कोटी मुलींचा विवाह १८ वर्षांआधीच

देशातील आरोग्याची स्थ‌तिी चिंताजनक असून, देशात दरवर्षी सुमारे १० कोटी ३० लाख मुलींचा विवाह त्यांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *