facebook
Saturday , February 25 2017
Breaking News
Home / Featured / मुस्लिमांना आपले म्हणा

मुस्लिमांना आपले म्हणा

 ‘देशातील मुस्लिमांकडे तिरस्काराच्या भावनेने पाहू नका; तसेच केवळ व्होट बँकेसाठी त्यांचा उपयोग करू नका. त्यांना आपले म्हणा,’ असे मतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. भाजप राष्ट्रीय कार्यकारिणी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मोदी बोलत होते.
मोदी म्हणाले, ‘देशातील निवडणुकांच्या पद्धतीमध्ये बदल घडवण्याची गरज आहे. सबका साथ सबका विकास हे तत्त्व सरकारने आपलेसे केले आहे. त्यामुळ या अंतर्गत सर्वच घटकांचा विकास करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. देशातील मुस्लिमांना अपमानास्पद वागणूक मिळता कामा नये. त्यांचा योग्य आदर होणे आवश्यक आहे,’ असेही मोदी यांनी म्हटले आहे.

मुस्लिमांच्या मतांना केवळ बाजारातील वस्तू समजणाऱ्या विरोधकांना मोदींनी धारेवर धरले. ‘समाजामध्ये एकात्मतेची भावना कायम असली पाहिजे. राज्यकर्ते आणि पक्षाबाबत सामान्यांच्या मनात शंका निर्माण होणे, हे लोकशाहीसाठी घातक आहे,’ असेही

मोदी म्हणाले.

भारतावर युद्ध लादले

‘पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाने भारतावर युद्ध लादले आहे. गेल्या २५ वर्षांपासून पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे हल्ले भारत सहन करीत आहे. जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी चळवळींना पाकचा पाठिंबा आहे. पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे संयुक्त राष्ट्रांमधील भाषण दहशतवादाचे पाठराखण करणारे आहे. उरीच्या भ्याड हल्ल्याचा आम्ही निषेध करून शहीद जवानांना श्रद्धांजली अपर्ण करतो. या हल्ल्याला जोरदार जाईल,’ असा इशारा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दिला.

कोझिकोड येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत शहा बोलत होते.‌

शहा म्हणाले, ‘संपूर्ण देश पाकिस्तानच्या दहशतवादाविरोधात उभा आहे. जनतेते पाकिस्तान विरोधात प्रचंड संताप आहे. भाजप आणि केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत दहशतवाद खपवून न घेण्याचे धोरण स्वीकारले आहे. दहशतवादी कारवायांना सडेतोड उत्तर दिले जाईल. उरी हल्ल्यानंतर सरकारने दहशतवादाविरोधात कठोर कारवाईचे धोरण स्वीकारले आहे. सुरक्षा दलांकडून गेल्या आठ महिन्यांत ११७ दहशतवादी मारले गेले आहेत. याच काळात दहशतवाद्यांनी १७ वेळा सरहद्द ओलांडण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवादाविरोधातील युद्ध अंतिम विजय आपला आहे. केंद्र सरकार जगाला पाकिस्तानचा खरा चेहरा दाखवून देईल, जागतिक पटलावर पाकिस्तानला एकाकी पाडले जाईल.’

मोदी म्हणाले…

जागतिक तापमानवाढ (ग्लोबल वॉर्मिंग) हा जगाच्या चिंतेचा विषय आहे. पर्यावरणविषय पॅरिस कराराला येत्या गांधी जयंतीदिवशी मान्यता देण्यात येईल.

भारतीय जनता पक्षाची स्थापना ही गरिबांच्या सेवेसाठी झालेली आहे.

तळागाळातील जनतेच्या विकासासाठी आमचा पक्ष कार्यरत आहे.

लोककल्याण हे भारतीय जनता पक्षाचे तत्त्व आहे. या तत्त्वाबाबत कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही.

मुस्लिमांना आपले म्हणा; केवळ व्होट बँकेसाठी उपयोग करू नका.

Check Also

अशोक खरात – प्रभाग क्र. ११ ‘क’ गट राष्ट्रीय समाज पक्षाचे अधिकृत उमेदवार

Click on Below Video Related

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *